शहरं
Join us  
Trending Stories
1
Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील?
2
'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?
3
VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'!
4
UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...
5
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी
7
मेधा पाटकरांना 5 महिने कारावास अन् 10 लाखांचा दंड, 23 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा
8
विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....
9
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी 
10
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
11
'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
12
राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू
13
“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
14
“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 
15
"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल
16
"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  
17
'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान
18
“खऱ्या अर्थाने वंचित, दलितांना न्याय देण्याचे काम भाजपा करते”; अमित गोरखेंची प्रतिक्रिया
19
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह या पाच जणांना संधी
20
शेकडो कर्मचाऱ्यांसाठी रतन टाटा बनले संकटमोचक; नोकरीवरुन काढण्याची नोटीस घेतली मागे

टायगरकडून मायकल जॅक्सनला नृत्यांजली, नागपूरकर मंत्रमुग्ध

By admin | Published: July 12, 2017 6:32 PM

डान्सिंग स्टार टायगर श्रॉफ याने आंतरराष्ट्रीय पॉपस्टार मायकल जॅक्सन याला आज नागपूरमध्ये कोराडी मार्गावरील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इन्डोअर स्टेडियममध्ये...

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 12 - डान्सिंग स्टार टायगर श्रॉफ याने आंतरराष्ट्रीय पॉपस्टार मायकल जॅक्सन याला आज नागपूरमध्ये कोराडी मार्गावरील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इन्डोअर स्टेडियममध्ये अनोखी नृत्यांजली वाहिली. लोकमत आणि प्रीति आयआयटी पिनॅकल यांच्या सहयोगाने  मायकल जॅक्सनला नृत्यांजली म्हणून टायगरचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. टायगर श्रॉफ याने अभिनेत्री निधी अगरवालसमवेत दिलखेचक अदांसह ठेका धरला. यावेळी मुन्ना मायकलच्या कलाकारांसोबत सेल्फी काढण्यासाठी सर्वांची झुंबड उडाली होती.

यावेळी बोलताना टायगर श्रॉफनं लोकमतचे आभार मानले. तो म्हणाला, लोकमतने आंतरराष्ट्रीय नृत्यसम्राट मायकेल जॅक्सनला अनोख्या प्रकारे श्रद्धांजली वाहण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. याचबरोबर माझा आगामी चित्रपट "मुन्ना मायकल"चं इतक्या मोठ्या संख्येने नागपूरकरांनी स्वागत केलं; त्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे आणि माझ्या पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा मिळाली आहे.

यावेळी टायगरसमवेत अभिनेत्री निधी अग्रवालदेखील उपस्थित होती. सोबतच सुप्रसिद्ध गायक सिद्धार्थ महादेवन हे देखील विशेष आकर्षण होते. या कार्यक्रमात सिद्धार्थ चित्रपटांतील सुपरहीट गाण्यांचे सादरीकरण झाले. टायगरच्या डान्सनं नागपूरकरांना ठेका धरण्यास भाग पाडलं.

कार्यक्रमाला मोदी लेन्स मॉल प्रा.लि., उमंग ग्रुप (उमंग गीताई गर्ल्स कॉलेज), पिकर ऑॅनलाईन आणि कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानचे शशिकांत बोदड हे सहकार्य करीत आहेत. हॉस्पिटॅलिटी पार्टनर म्हणून हॉटेल सेंटर पॉर्इंटचे सहकार्य मिळत आहे. टायगरचा आगामी चित्रपट मुन्ना मायकल 21 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि विकी राजानी हे या सिनेमाचे निर्माता आहेत, तर सब्बीर खान हे दिग्दर्शक आहेत.