शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

सूक्ष्म सिंचनाचे अनुदान मार्चपासून मिळणार

By admin | Published: December 19, 2014 2:42 AM

मागील तीन वर्षांपासून सूक्ष्म सिंचनाचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाही, अशी कबुली देत ते अनुदान पुढील मार्च महिन्यापासून देण्यात येईल, अ

नागपूर : मागील तीन वर्षांपासून सूक्ष्म सिंचनाचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाही, अशी कबुली देत ते अनुदान पुढील मार्च महिन्यापासून देण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. भाजपाचे सदस्य बाबुराव पाचर्णे यांनी यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर जयप्रकाश मुंधडा, जयदत्त क्षीरसागर, हरिभाऊ जावळे यांनीही उपप्रश्न उपस्थित केले. यावर उत्तर देताना खडसे यांनी सांगितले की, सूक्ष्म सिंचन कार्यक्रम २०१३-१४ पर्यंत केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियान म्हणून राबविण्यात येत होते. आता सन २०१४-१५ पासून केंद्र शासनाने राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानाचा समावेश राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत ‘शेतावरील पाणी व्यवस्थापन उपअभियान’ म्हणून केला आहे. केंद्र शासनाने केंद्राच्या हिश्श्यापोटी शेतावरील पाणी व्यवस्थापन उपअभियानासाठी १७७.५० कोटी रुपयांचा कार्यक्रम मंजूर केला असून ६२.५० कोटी रुपये इतका निधी वितरित केला आहे. सदर निधी कृषी आयुक्तालयाकडून जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आला आहे. केंद्र हिश्श्याच्या प्रमाणात राज्य हिश्शाचा निधी १५.६३ कोटी जिल्हा स्तरावर उपलब्ध आहे. सन २०१४-१५ पासून शेतावरील पाणी व्यवस्थापन उपअभियानांतर्गत अवर्षणप्रवण क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ६० टक्के व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान देण्यात येते व अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ४५ टक्के व इतर शेतकऱ्यांना ३५ टक्के अनुदान देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हे अनुदान ९० टक्के देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. त्याबाबत निर्णय व्हायचा आहे, मात्र अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना मात्र ९० टक्के अनुदान देण्यात येत असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)