शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
2
Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीचा मुंबईतल्या जागांचा फॉर्म्युला ठरला; अजित पवार गटाला ३ जागा तर भाजपा, शिवसेनेला...
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरणार?; चर्चा रंगल्यानंतर अशोक चव्हाणांचा खुलासा
4
Sankashti Chaturthi 2024: चतुर्मासातली शेवटची 'दाशरथी' संकष्टी; विधिवत गणेशपूजन करा, पुण्यफळ मिळवा!
5
आटपाडीच्या ओढ्याला ५०० च्या जुन्या-नव्या नोटांचा पूर आला; नागरिकांनी लुटल्या लाखोंच्या नोटा
6
जस्टिन ट्रुडोंच्या अडचणीत वाढ, कॅनडाचा अधिकारी दहशतवादी कारवायांमध्ये सामील; भारताने फोटो आणि नाव पाठवले
7
जाहीर सभेत राहुल गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य, भाजप आमदारावर गुन्हा दाखल
8
Karva Chauth 2024: द्रौपदीनेही पांडवांसाठी केले होते करवा चौथ व्रत; वाचा व्रताचे महाभारत कनेक्शन!
9
डिसेंबरमध्येही कार-होम लोन स्वस्त होणार का? RBI गव्हर्नरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
10
मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार! अतिरेक्यांनी गावात केले बॉम्बस्फोट
11
अतुल परचुरेंच्या निधनानंतर नरेंद्र मोदींचं सोनिया परचुरेंना भावनिक पत्र, म्हणाले- "या कठीण काळात..."
12
दिवाळीपूर्वी 'या' बँकेचा ग्राहकांना झटका, सेव्हिंग अकाऊंटवरील व्याजदरात कपात, नवे दर काय?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस-ठाकरे गटातील वाद मिटणार? प्रभारी रमेश चेन्नीथला ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
14
"गांधी कुटुंबाने माझ्याविरोधात निवडणूक लढवून ३ लाख मतं मिळवावीत, मी राजकारणातून संन्यास घेईन"
15
बियर्ड हटाओ, प्यार बचाओ! कॉलेजमधील मुलींचं आंदोलन; म्हणाल्या, गर्लफ्रेंड हवी की दाढी...
16
एअर डिफेन्स भेदत नेतन्याहू यांच्या निवासस्थानाजवळ कोसळलं लेबेनॉनमधून आलेलं ड्रोन, इस्राइलमध्ये खळबळ   
17
डंका तर BSNL चाच वाजणार! मोबाईलवर ३६००० किमीवरून मेसेज आला, हॅलो इंडिया; नवी स्वदेशी टेक्निक...
18
हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...
19
Rishabh Pant नं साधला मोठा डाव; MS धोनीचा विक्रम मोडित काढत ठरला 'नंबर वन'
20
गर्लफ्रेंडच्या घरी प्रेमीयुगुलाची भेट, पण कुटुंबीयांनी रंगेहाथ पकडलं; बॉयफ्रेंडला पेटीत लपवलं...

प्रकल्पग्रस्तांच्या शिक्षणासाठी एमआयडीसी देणार भूखंड

By admin | Published: July 23, 2016 2:59 AM

प्रकल्पग्रस्त तरूणांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी एमआयडीसी आयटीआयला भुखंड उपलब्ध करून देणार आहे.

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्त तरूणांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी एमआयडीसी आयटीआयला भुखंड उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय कुकशेत ग्रामस्थांच्या भुखंडांचे करारनामे करण्यासाठी लागणारे मुद्रांक शुल्कही माफ केले जाणार असल्याचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आमदार मंदा म्हात्रे यांना लिखीत स्वरूपात कळविले आहे. ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील प्रकल्पबाधितांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. कुकशेतग्रामस्थांना वितरीत केलेल्या भुखंडांचे करारनामे व इतर अनेक प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. अनेक वर्षांपासून प्रलंबीत असणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या औद्योगिक महामंडळाने मान्य केल्या असून याविषयीची लेखी पत्र म्हात्रे यांना दिले आहे. कुकशेत ग्रामस्थांचे करारनामे करण्याबाबतच्या कार्यवाहीबाबत मुख्यालय स्तरावरून मंजूरी देण्यात आली आहे. त्यासाठी भरावे लागणारे मुद्रांक शुल्क महामंडळ स्वत: भरणार असून ते पुढील कार्यवाहीसाठी महापे कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे. प्रकल्पग्रस्तांना १०० चौरस मीटर भुखंडाचे वाटप करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली असून मे २०१५ पर्यंत प्राप्त अर्जांची छाननी सुरू केली आहे. प्रकल्पग्रस्त व अपंग नागरिकांना प्रशिक्षण देणारी संस्था सुरू करण्याची मागणी केली होती. परंतू एमआयडीसी प्रशासनाला अशाप्रकारचे प्रशिक्षण केंद्र सुरू करता येत नाही. यामुळे आयटीआयला भुखंड उपलब्ध करून त्यांच्या माध्यमातून प्रशिक्षण संस्था सुरू केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. एमआयडीसीमधील उद्योगांमध्ये प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्याची तरतूद यापुर्वीच केली आहे. या करारनाम्याप्रमाणे उद्योजकांनी अंमलबजावणी केली आहे का याची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर संबंधीतांना एमआयडीसीकडून दाखले दिले जात आहेत. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी दोन वर्ष मंदा म्हात्रे यांनी पाठपुरावा केला होता. त्यानी दिलेल्या निवेदनांवर काय कार्यवाही केली याचा तपशील महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लेखी स्वरूपात दिला आहे. २० ते ४० वर्षांपासूनचे अनेक प्रश्न सुटल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)>कार्यवाहीबाबत मुख्यालय स्तरावर मंजुरीकुकशेत ग्रामस्थांचे करारनामे करण्याबाबतच्या कार्यवाहीबाबत मुख्यालय स्तरावरून मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी भरावे लागणारे मुद्रांक शुल्क महामंडळ स्वत: भरणार असून ते पुढील कार्यवाहीसाठी महापे कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे. कुकशेत ग्रामस्थांच्या करारनाम्यासाठी भरावे लागणारे मुद्रांक शुल्क औद्योगिक विकास महामंडळ स्वत: भरणार आहे. याशिवाय प्रकल्पग्रस्त तरूणांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी भुखंड उपलब्ध करून देणार असल्याचे मान्य केले आहे. - मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर