शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
5
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
6
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
7
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
8
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
10
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
11
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
12
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
13
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
14
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
15
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
16
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
17
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
18
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
19
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
20
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका

मधल्या सुट्टीत वडापाव, बर्गर, चिप्सवर ताव

By admin | Published: June 27, 2017 3:05 AM

गेल्या काही वर्षांत बदलेल्या जीवनशैलीबरोबरीनेच खाद्यसंस्कृतीतही बदल झाले आहेत. घरचे शिजविलेले, सकस अन्न खाण्यापेक्षा पॅक बंद पदार्थ

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या काही वर्षांत बदलेल्या जीवनशैलीबरोबरीनेच खाद्यसंस्कृतीतही बदल झाले आहेत. घरचे शिजविलेले, सकस अन्न खाण्यापेक्षा पॅक बंद पदार्थ, जंक फूडला अधिक पसंती मिळते. घरातल्या मोठ्या माणसांच्या बरोबरीनेच लहान मुलेही मिटक्या मारत हे पदार्थ खाताना दिसतात. यामुळे लहान वयात वजन वाढणे आणि वाढत्या वजना बरोबरीने येणारे आजार मुलांना जडत आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे लक्षात घेऊन, शाळांमध्ये जंक फूड, अधिक शर्करा असणारे, मीठ अतिप्रमाणात असलेले, मेदयुक्त पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. त्या बदल्यात भाजी-पोळीसारखा आहार द्यावा, असे असा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. शाळेच्या नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना आता उपहारगृहात सकस आहार मिळेल, अशी अपेक्षा होती, पण ‘लोकमत’ प्रतिनिधींनी मुंबईतील शाळांमध्ये केलेल्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये मात्र, अपेक्षाभंग करणारे चित्र दिसून आले. काही शाळांनी जंक फूड, चॉकलेट्सवर बंदी आणली, पण वडापाव, समोसा पाव, चिवडा हे विकले जातात. कोणत्याही शाळेत सकस आहार मिळत नसल्याचे आढळून आले. वेळ - १.३० वाजता या शाळेत प्रवेश करण्याचा प्रतिनिधीने प्रयत्न केला असता, त्याला प्रवेशद्वारावरच अडविण्यात आले. त्याच्याकडे चौकशी करून त्याला शाळेत प्रवेश नाकारला, पण शाळा सुटल्यावर बाहेर आलेल्या विद्यार्थ्यांशी प्रतिनिधीने संवाद साधला. त्या वेळी खरी परिस्थिती समोर आली. या शाळेच्या उपहारगृहात ज्या पदार्थांवर बंदी घातली आहे, ते सर्रासपणे मिळत असल्याची माहिती मिळाली. विद्यार्थी हे पदार्थ आवडीने खातात, असेही त्यांच्याकडून कळले. संवादप्रतिनिधी - शाळेच्या उपहारगृहात जंक फूड मिळते का?विद्यार्थी - होय.प्रतिनिधी - कोणते-कोणते पदार्थ मिळतात. विद्यार्थी - समोसा, दाबेली, वडापाव, कोबी मंचुरियन, चायनीज भेळ हे पदार्थ मिळतात. प्रतिनीधी - अजून कोणते पदार्थ मिळतात का?विद्यार्थी - नाही. प्रतिनिधी - तुम्ही हे पदार्थ खाता का?विद्यार्थी - होय, खातो ना, डबा असतोच. प्रतिनिधी - शाळेच्या उपहारगृहात काही पदार्थ विकण्यास सरकारने बंदी घातली आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?विद्यार्थी - होय, असा निर्णय झाल्याची माहिती आहे. प्रतिनिधी - मग या निर्णयानुसार कोणत्या पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे?विद्यार्थी - नाही, या पदार्थांची नावे माहिती नाहीत.लीलावतीबाई पोद्दार सीनियर सेकंडरी स्कूल, सांताक्रुझवेळ - १ वाजताशाळेत पोहोचल्यावर तळमजल्यावरील उपहारगृहात प्रतिनिधीने प्रवेश केला. मधल्या सुट्टीची वेळ असल्यामुळे उपहारगृहात विद्यार्थ्यांची गर्दी होती. या कँटीनमध्ये पिझ्झा, बर्गर, समोसा पावचा वास दरवळत होता. विद्यार्थ्यांना दिसतील, अशा पद्धतीने या पदार्थांची मांडणी करण्यात आली होती. या उपहारगृहात प्रवेश केल्यावरच विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. यातील अनेक विद्यार्थी हे पिझ्झा, बर्गर, हॉट डॉग अशा पदार्थांसाठी रांगेत उभे होते, तसेच वडापाव, समोसा पावालाही मागणी होती. त्याचबरोबरीने कोल्ड्रिंक आणि अन्य शीतपेये उपलब्ध होती. यातील काही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यावर विद्यार्थ्यांनी सांगितले की, डबा आणत नाही. त्यामुळे रोज मधल्या सुट्टीत कँटीनमध्ये येऊन हेच जंक फूड खातो, तर काहींच्या बोलण्यातून असे दिसून आले की, उपहारगृहात उधारीही ठेवली आहे. यावरूनच विद्यार्थी रोजच्या रोज याच कँटीनमधील या पदार्थांवर ताव मारत असल्याचे स्पष्ट झाले.वेळ - दुपारी २ वाजताया शाळेच्या तळमजल्यालाच उपहारगृह आहे. गतवर्षीपर्यंत या उपहारगृहात चॉकलेट, बिस्कीट खाद्यपदार्थ मिळत होते. मात्र, या वर्षीपासून शासनाने निर्बंध लादलेले पदार्थ विकणे कँटीनने बंद केले आहे. त्या बदल्यात भाजी, पोळी आणि पौष्टीक पदार्थ विकले जात आहेत. मात्र, या ठिकाणी फ्रँन्की दिली जात असल्याचे निदर्शनास आले. संवाद -प्रतिनिधी - नूडल्स मिळतील का?कँटीन चालक (महिला) - नाही. आमच्याकडे नूडल्स मिळत नाहीत.प्रतिनिधी - आइसक्रीम किंवा कोल्ड्रींक तरी मिळेल का?कँटीन चालक (महिला) - नाही, हे पदार्थ आता इथे मिळत नाहीत. शासनाने हे पदार्थ विकण्यास बंदी घातली आहे.प्रतिनिधी - किमान चॉकलेट किंवा कॅडबरी तरी मिळेल का?कँटीनचालक (महिला) - गेल्या वर्षांपर्यंत विकणारे हे पदार्थ यंदापासून बंद केले आहेत. शाळेच्या बाहेरच्या परिसरात मिळतील.प्रतिनिधी (कँटीनमधील पुरुष कर्मचाऱ्यास) - काउंटरवर फ्रँकी दिसत आहे.कँटीनमधील पुरुष कर्मचारी : हो, व्हेज फ्रँकी आहे.