शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

वीज पुरवठा खंडित करून घातपात घडवायचा होता?; ऊर्जामंत्र्यांकडून संशय व्यक्त

By कुणाल गवाणकर | Published: October 14, 2020 7:45 AM

Power Cut in Mumbai: सोमवारी मुंबई आणि परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता

मुंबई: सोमवारी मुंबई आणि शेजारच्या शहरांमधील वीज पुरवठा खंडित झाला होता. याचा मोठा परिणाम जनजीवनावर झाला. लोकल सेवा ठप्प झाली. सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल रात्री उशिरा एक ट्विट करत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. 'सोमवार दिनांक 12.10.20 रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही,' असं ट्विट नितीन राऊत यांनी रात्री बाराच्या सुमारास केलं. त्यामुळे चर्चेला उधाण आलं. मुंबई आणि परिसरात घातपात घडवण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

वीजपुरवठा खंडित; मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली ठप्पमहापारेषणच्या ४०० के. व्ही. कळवा-पडघा केंद्रातील सर्किट - २ चा वीजपुरवठा बंद पडल्यानं सोमवारी सकाळी १० वाजता मुंबईसह ठाणे, कल्याण व रायगड जिल्ह्यातील काही भागांचा खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत होण्यास सोमवारी रात्रीचे साडेबारा वाजले. भांडुप आणि ठाणे परिसरात सोमवारी रात्री साडेबारा ते एक वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा, पडघा, खारघर ट्रान्सफॉर्मर वाहिनी बंद झाल्यानं मुंबई व मुंबई उपनगरचा २२०० मेगावॅट वीजपुरवठा खंडित झाला. कळवा-खारघर येथील जंपर ब्रेकडाऊन झाला. सोमवारी दुपारी अडीच वाजता तो सुरू करण्यात आला. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. रेल्वेचा वीजपुरवठा वेगाने सुरळीत केला.

महापारेषणने उपकेंद्रांतील बिघाड दुरुस्त केल्यानंतर, मुंबई व मुंबई उपनगरांसह ठाणे व रायगड जिल्ह्यातील वीजपुरवठा महावितरणकडून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला. भांडुप परिमंडळातील सुमारे नऊ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी रात्रीपर्यंत सुरू करण्यात आला. उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठाही टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला. महापारेषणच्या म्हणण्यानुसार, रेल्वे व रुग्णालयांचा वीजपुरवठा प्राधान्याने सुरू करण्यात आला. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास बंद पडलेली मुंबई वीज प्रणालीही सुरू करण्यात आली.

नेमकं काय झालं होतं?महापारेषणच्या ४०० के. व्ही. कळवा-पडघा वाहिनी क्रमांक १ ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट- २ वर होता. मात्र, सर्किट - २ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील काही भागांत वीजपुरवठा सोमवारी दिवसभर खंडित झाला. 

टॅग्स :Power ShutdownभारनियमनNitin Rautनितीन राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरे