जळगाव : दोन मुलांची आई असलेल्या ३२ वर्षीय महिलेने शेजारच्या २० वर्षीय बेरोजगार प्रियकरासोबत पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच अमळनेर येथे उघडकीस आला. पोलिसांनी या महिलेला पुण्यातून ताब्यात घेऊन जळगावात आणल्यानंतरही, तिने पतीसोबत जाण्यास नकार दिला.संबंधित महिलेच्या पतीचे अलिशान घर व उत्तम व्यवसाय असून या दाम्पत्याला १२ वर्षांची मुलगी व ८ वर्षांचा मुलगा आहे. या साऱ्या गोष्टी सोडून तिने ८ मार्च रोजी प्रियकरासोबत पलायन केले. त्यानंतर तिचा पती व प्रियकराचे आई-वडिल यांनी अमळनेर पोलिसात तक्रार दाखल केली.तोवर हे प्रेमवेडे शिर्डी, सोलापूर, हैदराबाद येथे फिरून पुणे येथे मुलाच्या नातेवाईक असलेल्या समाजसेविकेकडे जाऊन राहिले होते. मोबाइल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी पुण्यात दाखल होत, दोघांना ताब्यात घेऊन अमळनेर पोलीस ठाण्यात आणले.‘मला तुझे काहीच नको...’मला पतीकडे जायचे नाही, प्रियकरासोबतच राहायचे आहे, अशी भूमिका संबंधित महिलेने पोलिसांसमोर घेतल्याने पोलीसही चाट पडले. मात्र मुलांचा ताबा आपल्याकडेच ठेवण्याच्या अटीवर पतीने तिची मागणी मान्य केली. त्यावर ‘मला तुझे काहीच नको...’ असे उत्तर देत मुलांकडेही पाठ फिरवली. दोघांनी पोलिसात साक्षीदारांच्या समक्ष जबाब लिहून दिला. त्यावर रितसर नोटरी करून फारकत घेतली.
दोन मुलांच्या आईचे विशीतील प्रियकरासोबत पलायन; पतीसोबत पुन्हा नांदण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 2:32 AM