शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

 पुरुषोत्तम करंडकावर नगरचा झेंडा, न्यू आर्टसची माईक सर्वप्रथम 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 11:53 PM

आवाज कोणाचा अहमदनगरचा अशा जल्लोषात यावर्षी न्यू आर्टस्,सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालय अहमदनगर यांच्या माईक या एकांकिकेने पुरुषोत्तमचा मान मिळवला आहे.

पुणे, दि. 10 - महाविद्यालयीन जगताचा मानाचा समजला जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडकावर यंदा अहमदनगरच्या न्यू आर्टस, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयाच्या माईक या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे़ द्वितीय क्रमांकाचा हरिविनायक करंडक पी.इ. एस मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ए एस एल प्लिज या एकांकिकेने तर तिसºया क्रमाकांचा संजीव करंडक बी.एम.सी.सी महाविद्यालयाच्या सॉरी परांजपे या एकांकिकेने पटकावला. यावर्षी सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचा जयराम हर्डीकर करंडकाचा मान कोणीच मिळवू शकले नाही. सर्वोत्कृष्ट आयोजित संघ म्हणून वि.आय.आय.टी महाविद्यालयाच्या कोंडी या एकांकिकेतूला मिळाली आहे.महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल आज जाहीर झाला. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून ५१ महाविद्यालयीन संघांपैकी अंतिम फेरीसाठी ९ संघांची निवड करण्यात आली होती. ९ आणि १० सप्टेंबर या दोन दिवशी या ९ महाविद्यालयांनी उत्तम प्रकारे एकांकिकांचे सादरीकरण केले. यातून ४ महाविद्यालयांची पुरुषोत्तमसहित इतर २ करंडकासाठी निवड करण्यात आली.सर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्याचे पारितोषिक पी़ ई एस माडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आदित्य कुलकर्णी ( ए़एस एल प्लिज) याने तर सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनयाचे पोरितोषिक स़ प़ महाविद्यालयाचा नाथप्रसाद पुरंदरे (आदित्य मुजुमदार, भूमिका) याने मिळविले. अभिनय नैपुण्याचे पोरितोषिक बीएमसीसी च्या गंधर्व गुळवेकर (प्रण्योज, सॉरी परांजपे) आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयाची समृद्धी देशपांडे (मॉरगॉट, आस्टर द डायरी) यांनी पटकाविले.सवोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक ऋषी मनोहर याला सॉरी परांजपे (बृ. वाणिज्य महाविद्यालय) या एकांकिसाठी मिळाला. उत्तेजनार्थ दिग्दर्शकाचे पारितोषिक कृष्णा वाळके माईक (न्यु आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स, अहमदनगर) आणि सुरज गडगिळे यांना आफ्टर द डायरी (आबासाहेब गरवारे महाविद्यालय) यांना देण्यात आले.अभिनयाचे उत्तेजनार्थ पोरितोषिके खालील प्रमाणे ( भूमिका, एकांकिा, महाविद्यालय) : प्राची रोकडे, (माया, एएसएल प्लिज, पी़ ई़ एस़ मॉडर्न अभि.), विराज अवचित्ते (भय्या, माईक, न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स, नगर), कृष्णा वाळके (बज्या, माईक, न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स, नगर), पार्थ वाईकर (विश्वनाथ साने, साने आणि कंपनी, काशीबाई नवले अभि़), शुभम कुलकर्णी (गणेश, मुकुंद कोणी हा पाहिला, गरवारे वाणिज्य), हरिष बारस्कर (यशवंत, ड्रायव्हर, पेमराज सारडा, नगर), ओजस मराठे (सावरकर, भेट, फर्ग्युसन महा़), चिन्मय पटवर्धन (चैतन्यप्रभू, भूमिका, स़ प़ महा़), वैभवी चव्हाण (अ‍ॅन, आफ्टर द डायरी, आबासाहेब गरवारे), ऋचा भाटवडेकर (सुलोचना साने, साने आणि कंपनी, काशीबाई नवले अभि़),उत्तेजनार्थ विद्यार्थीनी दिग्दर्शिका हे पारितोषिक जान्हवी चावरे (इन बिटविन, सिंहगड अभि़) यांना तर सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखकाचे पोरितोषिक रत्नदीप शिंदे व सुरज गडगिळे (आफ्टर द डायरी, आबासाहेब गरवारे) यांना देण्यात आले.उत्तेजनार्थ विद्यार्थीनी लेखिका पूर्वा राजज्ञा, भावना झाडे (साकव, कमिन्स महिला अभि़) यांनी देण्यात आले तर सर्वोत्कृष्ट आयोजित संघ म्हणून भालचंद्र मानचिन्ह विश्वकर्मा इन्स्टिट्युट आॅफ इंन्फरमेशन टेक्नालॉजी या महाविद्यालयाच्या कोंडी या एकांकिकेला देण्यात आले आहे़ अंतिम फेरीचे परिक्षक म्हणून समर नखाते, मिलिदं फाटक आणि अमिता खोपकर यांनी काम पाहिले.