चरणसिंग थापा यांच्या नंतर आता मातोश्रीचे खास मिलिंद नार्वेकर देखील शिंदे गटात येत आहेत, असा दावा शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आणि राज्याच्या राजकारणात आणखी एक खळबळ उडाली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देखील प्रतिक्रिया आली आहे.
गुलाबराव पाटलाने पन्नास खोके घेतले हे मान्य आहे. पण चरणसिंग थापाने अख्खे आयुष्य बाळासाहेबांच्या चरणाशी घातले. ज्या थापाने बाळासाहेबांना अग्निडाग लावला. तो थापा देखील यांना सोडून आला. आता मिलिंद नार्वेकर येतायत, असे गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी म्हटले होते. यावर शिवसेनेतही प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
गुलाबराव हे आमचे खास आहेत. त्यांनी सहज बोलले असेल, मिलिंद नार्वेकर कधीच जाणार नाही. तो जवळचा आहे. मातोश्रीवर काम कसे करतात, हे त्यांना हवे असेल म्हणून ते त्यांना ओढण्याचे प्रयत्न करत आहेत, अशी प्रतिक्रिया औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. तर मिलिंद नार्वेकरांसारखा माणूस शिवसेना सोडून शिंदेंकडे जातील असे वाटत नाही. नारायण राणे, राज ठाकरेंनी त्यांच्यावरे जेव्हा आरोप केले, त्यातून ते बाहेर पडले. तिरुपती देवस्थानचे ते पदाधिकारी आहेत. त्यामुळे सद्भबुद्धीने ते असे काही करतील अशी शक्यता नाही, असे मुंबईच्या महापौरांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री म्हणून मला अनेजण भेटायला येत असतात. परंतू, मला अद्याप त्यांच्या भेटीविषयी काही माहिती नाहीय. मी ट्रान्परन्ट आहे. तुम्हाला माहिती आहे, असे कनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकर शिंदे गटात येत असल्याच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे शिंदे जेव्हा सुरतेला गेले होते, तेव्हा ठाकरेंचा निरोप घेऊन नार्वेकरच सुरतेला गेले होते. गणपतीमध्ये शिंदेंनी नार्वेकरांच्या घरी बाप्पाचे दर्शनही घेतले होते.