औरंगाबाद : मका मराठवाड्यातील महत्त्वाचे पीक़ ज्वारीला पर्याय, अपेक्षापेक्षा अधिक उत्पादन आणि चांगला भाव यामुळे मका लागवडीखालील क्षेत्र गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढले आहे. मात्र, पावसाचा खंड, वारंवार एकाच पिकाची लागवड, मातीचे बिघडलेले स्वास्थ्य यामुळे उत्पादन अस्थिर झाले आहे. त्याचा परिणाम उत्पादन खर्चाच्या ताळेबंदावर झालेला असताना लष्करी अळीचे आव्हान निर्माण झाले. या आव्हानात्मक परिस्थितीवर उपाय काढत नव्या संधी शोधण्याचा प्रयत्न ‘लोकमत अॅग्रोत्सवा’च्या माध्यमातून होणार आहे. मक्यासारखे नगदी पीक घेऊनही आर्थिक अस्थैर्र्याशी झगडणाऱ्या शेतकºयांच्या समृद्धीसाठी या मेळाव्यात चिंतन होणार आहे.संकरित वाणांच्या प्रसारानंतर ज्वारी आणि बाजारी या पारंपरिक पिकाला मक्यासारखा कमी खर्चात जास्त उत्पादन देणारा पर्याय मिळाला. विशेष म्हणजे खरिपासोबतच रबीतही हे पीक घेता येत असल्याने मक्याच्या लागवडीखालील क्षेत्र प्रचंड वाढले. औरंगाबाद जिल्ह्यात दीड लाख हेक्टरखाली असलेले मक्याचे क्षेत्र मराठवाड्यात तीन लाख हेक्टरवर पोहोचले आहे, राज्यात ९ लाख २१ हजार हेक्टरवर मक्याची लागवड केली जाते. मक्याच्या पिकांसाठी मराठवाड्यातील वातावरण आणि भौगोलिक परिस्थिती अनुकूल असली, तरी मागच्या काही वर्षांत नैसर्गिक आणि बाजारपेठीय आव्हाने निर्माण झाली आहेत. मराठवाड्यातील बहुतांश शेती कोरडवाहू आणि मान्सूनच्या लहरी पावसावर अवलंबून आहे. त्यातच शेतजमिनीची कमी धारणशक्ती अलीकडच्या काळात मोठी समस्या निर्माण झाली आहे. दुष्काळसदृश स्थिती सातत्याने उद््भवत असल्याने पीक भरणीच्या काळात पाणी तुटते. पाणी व्यवस्थापनाच्या अभावाचा फटकाही या पिकाला बसतो. त्याचा एकूण परिणाम उत्पादनावर होऊन शेतकºयाचे उत्पन्नाचे गणित बिघडल्याचे वारंवार दिसून आलेआहे.विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने मातीचे आरोग्य सुधारत शाश्वत वाट शोधण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे.आता अमेरिकन लष्करी अळीसारखे नवे संकट शेतकºयांसमोर आहे. यावरही मेळाव्यात नव्या उपायांचा शोध घेतला जाणार आहे. मक्याचे पीक तृणधान्यात जास्त उत्पादन देणारे आहे. मानवी आहार, जनावरांसाठी पशुखाद्य आणि औषधी क्षेत्रात बहुउपयोगी ठरते. याच अुनषंगाने मका शेतीतील नव्या शास्त्रीय आणि शाश्वत पर्याय यावर कृषी क्षेत्रातील अभ्यासक, प्रयोगशील शेतकरी आणि संशोधक या मेळाव्यात नव्याने मांडणी करणार आहेत.नागपूर (संत्रा)- १९ ते २१ जानेवारी २०१९ (रेशीम बाग). औरंगाबाद (कापूस)- २५ ते २८ जानेवारी २०१९ (कासलीवाल तापडिया मैदान). जळगाव (केळी)- २ ते ५ फेबु्रवारी २०१९ (जी.एस. मैदान/सागरपार्क). पंढरपूर (डाळिंब)- १३ ते १६ फेब्रुवारी २०१९ (कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान). या अॅग्रोत्सवाच्या अधिक माहितीसाठी मोविन मेन्झेस (मो. ७४००१९९९३९) आणि प्रशांत पाटील (मो. ९७६६९२८६८७) यांच्याशी संपर्क साधावा.
मक्यासमोरील ‘लष्करी’ आव्हान; उपाय आणि नव्या संधींवर मंथन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 6:19 AM