मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाची दरवाढ व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट प्रति लीटर पाच रुपये जमा करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनात सोमवारी प. महाराष्ट्रासह राज्यात शेतक-यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने, लाखो लीटर दुधाचे संकलन झाले नाही. लाखो लीटर दूध पडून राहिल्याने शेतकºयांचे ३५ कोटींहून अधिक नुकसान झाले. आंदोलनावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न पहिल्या दिवशी अयशस्वी ठरला. आंदोलन चिघळल्यास शहरांमध्ये दुधाचा तुटवडा जाणवू शकतो.कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात सोमवारी शेतकºयांनी दूधच न घातल्याने दूध संकलन जवळजवळ ठप्प झाले. पुण्यात मात्र चांगले दूध संकलन झाले. नाशिकला सव्वा लाख लीटर दूध संकलन झाले. दुधाचे २६ टँकर पोलीस बंदोबस्तात मुंबईकडे रवाना झाले.सातारा जिल्ह्यात धामणी येथे संतप्त शेतकºयांनी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला.मुंबईत पुरवठा सुरळीतदूध आंदोलनाचा परिणाम पहिल्या दिवशी मुंबई शहर व उपनगरात जाणवला नाही. दूध वितरक व डेअरीचालकांकडे पुरेसे दूध उपलब्ध होते. आंदोलन दोन-तीन दिवस सुरू राहिल्यास टंचाई जाणवू शकते.>थेट अनुदान नाहीच - मुख्यमंत्रीदुधाला लीटरमागे थेट अनुदान देण्याची मागणी नव्या भ्रष्टाचाराला जन्म देणारी आहे. फक्त ४० टक्केच दूध सहकारी दूध संघामार्फत संकलित केले जाते, तर ६० टक्के दूध हे खासगी दूध संघामार्फत संकलित होत आहे. त्यामुळे दुधासाठी लीटरमागे अनुदान देणे शक्य नाही. खासदार राजू शेट्टी यांचे दूध आंदोलन चुकीचे आहे. चर्चेची दारे नेहमीच खुली आहेत. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री>‘अमूल’चा वापर करू नका - शेट्टीअमूलने महाराष्टÑात यावे. निकोप स्पर्धा करावी. त्याला आमचा विरोध नाही, परंतु महाराष्टÑातील दूध उत्पादकांचे आंदोलन फोडण्यासाठी ‘अमूल’चा वापर करण्याचे कारस्थान खपवून घेणार नाही, असा इशारा खा.राजू शेट्टी यांनी बोईसर (पालघर) येथे पत्रकार परिषदेत दिला.>विधिमंडळात पडसाददूध आंदोलनाचे पडसाद विधिमंडळातही उमटले. कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, तसेच राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. विरोधकांनी घंटानाद आंदोलनही केले. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. -वृत्त/५>काहींनी गोरगरिबांना वाटले, काहींनी रस्त्यावर फेकलेलहान उत्पादकांनी घरीच दूध ठेवले. मोठ्या उत्पादकांनी पाहुणे, मित्र परिवार, गोरगरीब व शाळेतील मुलांना दूध वाटले. काही आंदोलकांनी मात्र दूध रस्त्यावर फेकले.
दूधकोंडी! आंदोलन चिघळल्यास आज शहरांमध्ये तुटवडा जाणवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 6:05 AM