- डिप्पी वांकाणी, मुंबई
गृहरक्षकांनी (होमगाडर््स) त्यांच्या वरिष्ठांशी संगनमत करून सरकारला कोट्यावधी रुपयांना लुबाडल्याचे उघडकीस आले आहे. अनेक होमगार्ड्स कर्तव्याच्या ठिकाणी हजर राहणे गरजेचे असतानाही हजेरीपटावर सह्या करून इतर कामे करण्यासाठी निघून गेल्याचे आणि अनेक जण एकाच वेळी दोन ठिकाणी कर्तव्यावर असल्याचे दाखवून त्याचे पैसे घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. होमगाडर््सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभियोग संचालकांना (डिरेक्टर ँप्रॉसुक्युशन) पत्र लिहून लबाडी करणाऱ्या होमगाडर््वर व ते ज्यांच्या हाताखाली होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करता येतील का यासाठी कायदेशीर सल्ला मागितला आहे.अभियोग संचालकांना २७ एप्रिल रोजी लिहिलेल्या पत्रात (या पत्राची प्रत लोकमतकडे आहे) म्हटले आहे की होमगाडर््स त्यांची नियुक्ती ज्या पोलीस ठाण्यांत आहे तेथून काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र ते तयार करीत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर चौकशी समिती स्थापन केली होती. समितीने केलेल्या चौकशीत अनेक होमगाडर््सनी एकाच वेळी दोन ठिकाणच्या कामाचे वेतन घेतल्याचे व अनेक जणांनी हजेरीपटावर खाडाखोड करून नव्याने नोंदी केल्याचेही आढळले आहे.उदा. रोज शेकडो होमगाडर््स वेगवेगळ््या रेल्वेस्थानकांवर नेमले जातात व त्यांना त्याची माहिती रेल्वे पोलिसांना द्यावी लागते. तथापि, अनेक होमगाडर््स हजेरीपटावर केवळ सही करून दुसरी नोकरी करण्यासाठी निघून गेल्याचे आढळले आहे. असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.राज्यातील सुमारे ३८ हजार होमगार्ड्सवर राज्य १२० कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च करते. होमगार्डला कर्तव्यावर असताना रोज ४०० रुपये दिले जातात. परंतु त्यांची जेथे नियुक्ती केलेली असते तेथील अधिकाऱ्यांशी संगनमत करतात. या ४०० रुपये हजेरीतून हा होमगार्ड त्याची जेथे नियुक्ती आहे तेथील अधिकाऱ्याला काही रक्कम देतो व तो अधिकारी होमगार्ड कामावर हजर होता अशा नोंदी करतो, असे सूत्रांनी सांगितले.स्वत:च केली नियुक्तीअनेक होमगार्ड्स अधिकृतपणे त्यांनी नियुक्ती नसतानाही वरिष्ठ नोकरशहा आणि मंत्र्यांच्या कार्यालयावर स्वत:च कामावर गेल्याचे आढळल्यानंतर त्यांना नुकतेच काढून टाकण्यात आले. हा प्रकार त्या होमगाडर््सनी वेतन मागितल्यावर उघडकीस आला.