शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

मृत व्यक्तींच्या नावे लाखोंचा निधी फस्त

By admin | Published: October 08, 2016 2:24 AM

तालुक्यातील अनेक लोकांना काम करूनही घामाचे पैसेच मिळाले नाहीत.

राहुल वाडेकर,

विक्रमगड- तालुक्यातील अनेक लोकांना काम करूनही घामाचे पैसेच मिळाले नाहीत. यापेक्षा ज्या व्यक्ती हयात नाहीत, अशा लोकांच्या नावाने पैसे काढून अपहार केल्याचे निदर्शनात आले आहे. रोजगार हमीच्या योजना कागदावरच रंगल्या असून हयात नसलेल्या व्यक्तींच्या नावाने पैसे काढून ठेकेदार व अधिकाऱ्यांनी लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचे पुढे आले आहे. तालुक्यातील खुडेद येथे शंभर आदिवासी समाजाची कुटुंब असलेली वस्ती असून येथे रोजगार हमी योजनेतून अनेक रस्त्यांची कामे झाल्याचे चित्र कागदावर पाहायला मिळत आहे. मात्र, प्रत्यक्षामध्ये ही कामे झालीच नसल्याचे दिसून येत आहे. सही करणाऱ्या व्यक्तीचे अंगठे टेकवून व अनेक मृत व्यक्तींच्या नावे तसेच अविवाहित तरु णांच्या पत्नीच्या नावे पैसे काढण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून हा सर्व पैसा वसूल करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी व आदिवासी विद्यार्थी कृती समितीचे शाखाप्रमुख लहू नडग यांनी केली आहे. दरम्यान, पूर्ण पालघर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप युवा स्पर्श सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन विलास भोईर यांनी केला आहे.आर्थिक वर्ष २०१४-१५, २०१६-१७ या कालावधीमध्ये खुडेद ग्रामपंचायतींतर्गत १२ पाड्यांच्या महात्मा गांधी रोजगार हमी कामांत मोठी अफरातफर व मोठा गैरव्यवहार झाल्याचे आदिवासी विद्यार्थी कृती समितीने केलेल्या आरोपात म्हटले आहे. याबाबत मोठे पुरावे म्हणजे १) खुडेद महालेपाडा ते खोरीपाडा रस्ता २) खुडेद माऊलीपाडा ते बिरारीपाडा रस्ता ३) खुडेद म्हसेपाडा ते स्मशानभूमी रस्ता ४) खुडेद गारमाळ ते भोयेपाडा रस्ता ५) मेन रोड ते धर्मा धवलू गावित रस्ता ६) मैदान सपाटीकरण जि.प. शाळा बोरसेपाडा ७) मैदान सपाटीकरण जि.प. शाळा बिरारीपाडा हे रस्ते व सपाटीकरणाची कामे अर्धवट असून यामध्ये अनेक त्रुटी आहेत. त्याचप्रमाणे या कामावर मजुरी करणाऱ्यांच्या रोजगाराचा निधी परस्पर लाटल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. तसेच अनेक स्थलांतरित मजुरांच्या नावावर निधी हडपल्याचा आरोप आदिवासी विद्यार्थी कृती समितीने केला आहे. >मृत व्यक्तींच्या नावाने काढलेल्या रकमा काशिनाथ नवसू काकवा - ५३७, १०२०, १०१४ रुपयेगंगू महादू खाटेरा - ५३७ , १०२०, १०१४, ८८८, एकूण ४५०९ रुपयेविष्णू काळू शेंडे - ५३७, १०२०, १०१४, ८८८, १०५० एकूण ४५०९ रुपयेकाशिनाथ जिव्या बिरारी - ५३७, १०२०, १०१४, ८८८, १०५६ एकूण = ४५०९ रुपयेकाळू सोनू शिंदे -५३७ रुपये>लग्नाअगोदरच रोजगार हमी योजनेत हात पिवळे : रोजगार हमी योजनेतून पैसे लाटणारे अधिकारी, ठेकेदार नवनवीन शकली लढवत आहे. विशेष म्हणचे कमलाकर लक्ष्मण पटारा याचे लग्न झाले नसतानाही त्याच्या पत्नीच्या नावावर २/०८/२०१५ रोजी १०१४, ९५४, १०१४, ९५४ इतक्या रकमा काढल्या आहे. >कृती समितीच्या मागणीकडे दुर्लक्षआदिवासी विद्यार्थी कृती समितीने माहितीच्या अधिकारात या गैरव्यवहाराबाबत सर्व पुरावे गोळा केले आहेत. याबाबत त्यांनी गटविकास अधिकारी विक्रमगड व जिल्हा अधिकारी कार्यालय, पालघर यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, याबाबत २०/०९/२०१६ रोजी सकाळी मीटिंग बोलवली होती. तीही रद्द करण्यात आली. त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी विक्रमगड यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून या गैरप्रकाराबाबत बैठक बोलवण्याबाबत विनंती करूनही जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून व पंचायत समिती विक्र मगड कार्यालयाकडून जाणूनबुजून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप आदिवासी विद्यार्थी कृती समितीने केला आहे