राजू काळे, ऑनलाइन लोकमत
भाईंदर, दि. १४ - मोदी सरकारने देशातील मुक्त अर्थव्यवस्थेचा दावा करीत चलनातील हजार व पाचशेच्या नोटा हद्दपार केल्या. त्यांच्या जागी नवीन दोन हजार व पाचशेच्या नोटा चलनात आणल्या आहेत. जुन्या नोटांची बनावटगिरी शोधून काढण्यासह त्या मोजण्यासाठी देशातील सर्वच बँकांसह आर्थिक व्यवहाराच्या ठिकाणी लाखोंनी नोट डिटेक्टींग व काऊंटिंग यंत्र (मशिन) बसविण्यात आले. आता हि यंत्रे नवीन नोटांतील सत्यता तपासण्यासाठी पुरेशी ठरणार कि जुन्या नोटांसह ती सुद्धा हद्दपार होणार, असा प्रश्न सध्या आर्थिक जगतात उपस्थित झाला आहे.
भारतीय अर्थव्यवस्था अस्थिर करण्यासाठी शेजारील देशातुन हजार, पाचशेच्या बनावट चलनी नोटांचा शिरकाव मोठ्याप्रमाणात होत होता. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना या बनावट नोटांंचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले होते. यामुळे त्रस्त झालेल्यांना बनावट शोधायच्या कशा, असा प्रश्न पडु लागला. यावर भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत खोट्या नोटा ओळखण्यासाठी जनजागृती करण्यात आली. दरम्यान बँकांत चनली नोटांचे प्रमाण वाढल्याने नोटा मोजण्याचे यंत्र बसविण्यात आले. हि यंत्रे सुरुवातीला केवळ चीनमध्ये आयात होऊ लागली. त्यानंतर खोट्या नोटा तपासण्यासाठी अल्ट्राव्हॉयलेट (युव्ही) प्रकाश झोत असलेल्या यंत्रांच्या वापरास सुरुवात झाली. तसेच सामान्यांसह काही किरकोळ व्यापाय््राांच्या वापरासाठी युव्हीची प्रकाश व्यवस्था असलेले पेन (लेखणी) बाजारात विक्रीसाठी आले. युव्हीचा प्रकाश त्या नोटांवर पडल्यास एका बाजुकडील छपाईमधील रेडीयमयुक्त वॉटरमार्क उठुन दिसत असे. यामुळे बनावट नोटांचा पर्दाफाश होऊ लागला. जुन्या यंत्रांतील तत्रज्ञान विकसित झाल्यानंतर बनावट नोटा शोधण्यासह त्या मोजण्याची स्वयंचलित यंत्रे बाजारात उपलब्ध झाली. यामुळे बँकांमधील आर्थिक व्यवहार विनासायास व विनाविलंब पार पाडण्यासाठी लाखोंच्या संख्येने देशात अशा यंत्रांची खरेदी झाली. त्यातच ज्या बँकांत जास्त व्यवहार आहेत, अशा बँकांत अनेक चलनी नोटा एकत्रित मोजुन त्याचे मुल्य व संख्या स्वतंत्रपणे दर्शविणारी यंत्रेही वापरली जाऊ लागली. यामुळे चलनी नोटा हातावेगळ्या करण्यासह त्यातील बनावटगिरी शोधणे सुरु असतानाच मोदी सरकारने जुन्या हजार, पाचशेच्या नोटा व्यवहारातुन हद्दपार केल्या. त्याऐवजी नवीन दोन हजार व पाचशेच्या नोटा चलनात आणल्या. नवीन नोटांमध्ये विशेष काही बदल नसल्याचा दावा अर्थतज्ञांकडुन करण्यात आला असला तरी त्या नोटा बनावटगिरीला रोखणाय््राा असल्याचा दावा मात्र सरकारने केला आहे. परंतु, त्या ओळखायच्या कशा, असा प्रश्न सामान्यांसह बँकांमधील कर्मचाय््राांना पडला आहे. काही ठिकाणी तर नवीन दोन हजारांच्या नोटांचा रंगच उडत असल्याची चर्चा सुरु असुन त्याला अद्याप पुर्णविराम मिळालेला नाही. तसेच या नोटा ओळखण्यासाठी अस्तित्वात असलेली यंत्रे हद्दपार होणार कि पुरेशी ठरणार, असा सवालही उपस्थित झाला आहे. याबाबत राज्यातील या यंत्रांचे उत्पादक अजय बेदागे म्हणाले, जी यंत्रे सर्व नोटा मोजुन त्यांचे मुल्य स्वतंत्रपणे दर्शवितात, ती यंत्रे बदलावी लागणार आहेत. त्याचप्रमाणे केवळ नवीन नोटा तपासण्यासह त्या मोजणाय््राा यंत्रांचे मात्र सोईनुसार कॅलिब्रेशन करावे लागणार आहे.