शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोट्यवधींच्या स्वेटर खरेदीत गोंधळ

By admin | Published: November 12, 2016 4:29 AM

सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आदिवासी विकास खात्यात आता स्वेटर खरेदेतील ‘साव(रा)ळा गोंधळ समोर आला आहे. या खरेदीसाठी बोलाविलेल्या निविदांपैकी विशिष्टच पात्र ठरविल्याने

यदु जोशी, मुंबई सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आदिवासी विकास खात्यात आता स्वेटर खरेदेतील ‘साव(रा)ळा गोंधळ समोर आला आहे. या खरेदीसाठी बोलाविलेल्या निविदांपैकी विशिष्टच पात्र ठरविल्याने आणि त्याभोवती संशयाचे दाट धुके निर्माण झाल्याने त्या रद्द केल्याशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती उद्भवली आहे.

या गदारोळात आता नोव्हेंबरच्या मध्यातही शासकीय आदिवासी आश्रमशाळांमधील १ लाख ८० हजार विद्यार्थ्यांना स्वेटर मिळू शकलेले नाही. गेल्या वर्षी असाच गोंधळ उडून अख्खा हिवाळा आदिवासी बालकांना कुडकुडत काढावा लागला होता. गेल्या वेळचा बट्ट्याबोळ लक्षात घेऊन यंदा अडीच महिन्यांपूर्वी स्वेटर खरेदीची निविदा काढण्यात आली होती. आदिवासी बालकांना वूलनचे स्वेटर द्यायचे असा तुघलकी निर्णय गेल्या वर्षी घेण्यात आला. हे स्वेटर ड्रायक्लीन करूनच घालावे लागतील. दुर्गम भागात ही सोय कुठून होणार, असे सवाल लोकमतने उपस्थित केल्यानंतर निर्णय मागे घेण्यात आला. नवीन काही निर्णयच घेतला नाही आणि सावळागोंधळ सुरूच राहिला.

यंदा ७० टक्के वूलन आणि ३० टक्के अ‍ॅक्रेलिक स्वेटरच्या खरेदीची निविदा अडीच महिन्यांपूर्वी काढण्यात आली. १९ निविदा भरण्यात आल्या. त्यांच्याकडील स्वेटरचे नमुने मुंबईतील एका प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठविण्यात आले. धक्कादायक म्हणजे त्यातील तीनच नमुने पात्र ठरले. अपात्र लोकांनी लगेच आरोप सुरू केले. मग नागपूरच्या एका प्रयोगशाळेत सगळे नमुने पुन्हा परीक्षणासाठी पाठविण्यात आले असता आधीचे तीन आणि आणखी एक असे चार नमुने पात्र ठरले. त्यामुळे संशयाचे धुके कायम राहिले.

त्यातच इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी एक हजार रुपये तर इयत्ता सहावी ते बारावीसाठी प्रत्येकी किमान १६०० रुपये इतका दर या निविदांमध्ये नमूद केलेला असल्याने हे दरही वादाच्या भोवऱ्यात सापडले. इतके महाग स्वेटर खरेदी करून साधारणत: ८ ते १० कोटी रुपयांमध्ये शक्य असलेली ही खरेदी तब्बल २४ कोटी रुपयांपर्यंत नेली जात असल्याचेही समोर आले. एवढेच नव्हे तर आदिवासी व इतर विभागात पुरवठादाराचे काम करणारे लोक पात्र आणि स्वत: उत्पादक असलेल्या कंपन्या अपात्र झाल्याबद्दलही तीव्र आक्षेप घेतले जात आहेत. या सर्व गदारोळाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून आता निविदा प्रक्रिया रद्द झाली नाही तर कंत्राटदारांचं चांगभलं होईल आणि सरकारी तिजोरीला मात्र कोट्यवधी रुपयांचा फटका बसेल, असे चित्र आहे. ------------------------------लोकमतची भूमिकाविशिष्ट कंत्राटदारांचे हित समोर ठेऊन निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याचे गंभीर आरोप स्वेटर खरेदीबाबत होत आहेत. या बाबतच्या गंभीर तक्रारी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेल्या आहेत. सरकारी तिजोरीला फटका देऊन कुणाला मलिदा देणे अजिबात योग्य नाही. निविदा प्रक्रिया रद्द तर कराच पण जास्तीतजास्त आठ दिवसांत आदिवासी विद्यार्थ्यांना स्वेटर मिळतील, याची जबाबदारीही सरकारने घेतलीच पाहिजे. -------------------------------सावराकाका तुम्हीकधी देणार हो स्वेटर!विष्णू सावरा हे आदिवासी विकास मंत्री झाल्यापासून आदिवासी बालकांना कुठलेही साहित्य वेळेत मिळालेले नाही. दोन वर्षांत बूट, मोजे, शालेय साहित्याबाबत असेच हाल झाले. गेल्यावर्षी स्वेटरच मिळाले नाहीत. यंदा सावराकाका स्वेटर कधी देतात याची मुलांना प्रतीक्षा आहे.आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवराही परिस्थिती रुळावर आणू शकलेले नाहीत. -------------------------------