शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
2
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
3
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
4
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
5
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
6
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
7
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
8
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
9
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
10
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
11
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
12
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
13
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
14
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
15
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
16
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
17
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
18
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
19
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
20
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन

‘एमआयएम’ची नजर प्रस्थापित पक्षांच्या नाराजांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2017 2:09 AM

महापालिकेच्या रिंगणात प्रथमच उतरत असलेला एमआयएम दोन्ही कॉँग्रेस व समाजवादी पार्टीसाठी डोकेदुखी ठरणार

जमीर काझी,

मुंबई- मुंबई महापालिकेच्या रिंगणात प्रथमच उतरत असलेला एमआयएम दोन्ही कॉँग्रेस व समाजवादी पार्टीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. अद्याप उमेदवार जाहीर झालेले नसले तरी मुस्लीम व दलित बहुवस्ती असलेल्या सुमारे ७५ ते ८० प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्याचे पक्षाने निश्चित केले आहे. त्यासाठी मातब्बरांबरोबरच कॉँग्रेस, राष्ट्रवादी व सपाच्या नाराज इच्छुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. भायखळा, नागपाडा, मालाड, वांद्रे, कुर्ला, गोवंडी, धारावी या वॉर्डवर एमआयएमने लक्ष केंद्रित केले आहे. या ठिकाणच्या मुस्लीम व दलित समाजातील मातब्बरांना तिकीट दिले जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमचा उमेदवार भायखळ्यातून विजयी झाला. तर वांद्रे पूर्व या मतदारसंघातून पक्षाने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यामुळे महापालिकेच्या रिंगणात त्यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष आहे. एमआयएममुळे धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होणार असल्याने भाजपा व शिवसेनेला ते फायद्याचे ठरणार आहे. तर काँग्रेस, समाजवादी व राष्ट्रवादी काँग्रेससाठी अडचणीचे ठरणार आहे. एमआयएमच्या उमेदवाराला जितकी मते मिळतील, तितका त्यांना तोटा होणार आहे. ‘एमआयएम’च्या प्रचाराची धुरा ओवेसी बंधूंवर असून त्यांनी आचारसंहितेपूर्वी मुस्लीमबहुल वस्ती असलेल्या भागात दोन सभा घेऊन वातावरणनिर्मिती केली आहे. १९ फेबु्रवारीपर्यंत दोघा भावांच्या जवळपास ३० सभांचे नियोजन करण्यात आलेले आहे. एमआयएमचे मुंबई अध्यक्ष मतनी, भायखळ्यातील आमदार वारिस पठाण हे कॉँग्रेस, सपा व राष्ट्रवादीतील स्थानिक भागातील मातब्बर नेत्यांवर नजर ठेवून आहेत. त्यांना पक्षातर्फे उमेदवारी डावलण्यात आल्यानंतर पार्टीत घेऊन तिकीट दिले जाणार आहे. प्रामुख्याने मुस्लिमांबरोबर काही दलित समाजातील उमेदवार देण्याचे पक्षाने ठरवले आहे.