नागपूर : कामठी नगर परिषदेत एक जागा जिंकत खाते उघडल्यानंतर आता एमआयएमने नागपूर महापालिकेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. विशेष म्हणजे नागपुरात आपली पकड घट्ट करण्यासाठी दलित-मुस्लिमांना एकत्र करण्याची रणनीती एमआयएमने आखली आहे. यासाठीच एमआयएमने बसपा, बहुजन रिपब्लिकन समाज पक्ष (बीआरएसपी) यासह विविध रिपब्लिकन गटांशी हात मिळविण्याची तयारी चालविली असून तसे प्रस्तावही संबंधित पक्षांकडे सादर केले आहेत. नागपुरात एमआयएम पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात दिसणार आहे. मात्र, आपला जनाधार वाढविण्यासाठी रणनीतीत बदल केल्याचे पहावयास मिळत आहे. खुल्या जागांवरही ‘नॉन मुस्लीम’ चेहरे देण्याचे लवचिक धोरण एमआयएमने स्वीकारले आहे. नागपुरात सर्वच स्टार प्रचारक मैदानात उतरल्याचे पहावयास मिळेल, असा दावा पक्षातर्फे करण्यात आला आहे. एमआयएम ही भाजपाची ‘बी टीम’ असल्याचा आरोप काँग्रेसकडून नेहमीच केला जातो. नागपुरात एमआयएमने हा आरोप खोडून काढला आहे. (प्रतिनिधी)
एमआयएमचे मिशन नागपूर
By admin | Published: January 29, 2017 12:44 AM