मुंबई : उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या शीत वाऱ्यामुळे राज्यासह मुंबई गारठली आहे. शुक्रवारी सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे ५.९ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. मुंबईचे किमान तापमान १४.६ अंश नोंदवण्यात आले आहे. मागील आठवड्याभरापासून मुंबईचे किमान तापमान १४ अंशांच्या आसपास नोंदवण्यात येत आहे. रात्री वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा जोरही वाढला आहे. परिणामी वाढत्या थंडीचा कडाका कायम राहिल्याने मुंबई चांगलीच गारठली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. कोकण-गोवा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. (प्रतिनिधी)
मुंबई गारठली किमान तापमान १४ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2017 2:13 AM