जे तुम्ही केलं ते बरोबर आणि आम्ही केलं ते चुक कसं होतं?; छगन भुजबळांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 04:31 PM2023-12-01T16:31:51+5:302023-12-01T16:34:08+5:30

जास्तीत जास्त आमदार, खासदार आपल्याला निवडून आणावे लागतील. त्यासाठी आपल्याला सर्व घटकांना सोबत घेऊन चालावे लागेल असं भुजबळांनी म्हटलं.

Minister Chhagan Bhujbal asked a question to Sharad Pawar | जे तुम्ही केलं ते बरोबर आणि आम्ही केलं ते चुक कसं होतं?; छगन भुजबळांचा थेट सवाल

जे तुम्ही केलं ते बरोबर आणि आम्ही केलं ते चुक कसं होतं?; छगन भुजबळांचा थेट सवाल

कर्जत -  आपला पक्ष हा नवीन पक्ष नाही तर १९९९ साली स्थापन झालेला पक्ष हाच आहे. पहिला प्रदेशाध्यक्ष मीच आहे. २००४ साली काही ना काही सुरुच आहेत. आता तळ्यातमळ्यात करण्याऐवजी निर्णय घेण्याची गरज होती. अशा घटना एकदा नाही तर अनेकदा झाल्या. भाजपसोबत सत्तेत अनेक लोक गेले त्यांनी त्यांची भूमिका बदलेली नाही. भाजप आणि शिवसेना यांची विचारधारा एक असतानाही जेव्हा शिवसेनेसोबत गेलो ती भूमिका मान्य झाली पण भाजपसोबत जाण्याची भूमिका मान्य नाही. शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे, विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला सत्तेत जावे लागेल. जे तुम्ही केलं ते बरोबर आणि आम्ही केलं ते चुक कसं होतं असा थेट प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. कर्जत इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात ते बोलत होते. 

छगन भुजबळ म्हणाले की, अलीकडे ज्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्या त्यात राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हे स्पष्ट झाले. जनतेने या निवडणुकीतून आपल्या पक्ष आणि आपल्या निर्णय योग्य असल्यावर शिक्कामोर्तब केला.सध्या पक्षाची न्यायालयीन प्रक्रिया सुरु असली तरी न्याय आपल्याच बाजूने होईल आणि निश्चितपण आपला विजय होईल हा विश्वास आहे. आता आपण कार्यालयात येण्याऐवजी गावपातळीवर, शहरपातळीवर पक्षाची पाळमूळ घट्ट रोवली पाहिजे. अडचणीत आलेल्या लोकांसाठी काम करणे हे आपले काम आहे. अजितदादा मुख्यमंत्री व्हावे यासाठी राज्यातील जनतेच्या शुभेच्छा आपल्यासोबत आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त आमदार, खासदार आपल्याला निवडून आणावे लागतील. त्यासाठी आपल्याला सर्व घटकांना सोबत घेऊन चालावे लागेल असं त्यांनी म्हटलं. 

तसेच आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही पण इतर कोणात्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. ही भूमिका प्रत्येकांची आहे.आज आरक्षणासाठी सरकारला वेठीस धरण्याचे काम होत असताना जनतेलाही वेठीस धरण्याचे काम होत आहे. राज्यकर्ता हा सगळ्यांचा असतो तो कोणत्याही एका समाजाचा नसतो. त्यामुळे सगळ्यांना समान न्याय मिळायला हवा. जर कोणावर अन्याय होत असेल तर आपण गप्प बसून कसे चालेल. घरांवर हल्ले होत असलेली परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. आपल्याला सर्व जाती, धर्मांना, शिवरायांनी घडविलेल्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचे आहे असंही छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितले. 

Web Title: Minister Chhagan Bhujbal asked a question to Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.