"सरकार बदलायचे आहे"; शरद पवारांच्या विधानानंतर भुजबळ गंभीर; म्हणाले, "ते कामाला लागलेत"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 02:48 PM2024-06-13T14:48:15+5:302024-06-13T15:00:47+5:30

शरद पवार यांनी सरकार बदलण्याबाबत केलेल्या विधानाला मंत्री छगन भुजबळ यांनी गांभीर्याने घेतले आहे.

Minister Chhagan Bhujbal has taken Sharad Pawar statement about changing the government seriously | "सरकार बदलायचे आहे"; शरद पवारांच्या विधानानंतर भुजबळ गंभीर; म्हणाले, "ते कामाला लागलेत"

"सरकार बदलायचे आहे"; शरद पवारांच्या विधानानंतर भुजबळ गंभीर; म्हणाले, "ते कामाला लागलेत"

Chhagan Bhujbal on Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी विधानसभेची निवडणूक ही एकत्रितरित्या लढवण्याचे ठरवलं आहे. तर दुसरीकडे महायुतीने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र प्रत्येक पक्षाने निवडणुकीची तयारी सुरु केलीय. दुसरीकडे राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनीही विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. सहा महिन्यात सरकार बदलायचं असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं. त्यानंतर आता शरद पवार यांचे हे म्हणणं छगन भुजबळ यांनी गांभीर्याने घेतलं असून पक्षाला सल्ला दिलाय.

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन शरद पवार हे आक्रमक झाले आहेत. बुधवारी इंदापूर तालुक्यातील दुष्काळी दौऱ्यात शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी महत्त्वाचे विधान केले होते. "दुधाच्या दरासंबंधी सरकारकडे आपल्याला गाऱहाणे मांडावे लागेल. जर आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर रस्त्यावर यावे लागेल. ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. हे प्रश्न लगेच सुटणार नाहीत. त्यासाठी शेतकऱ्यांनी आम्हाला चार-सहा महिने दिले पाहिजेत. या कालावधीत मला सरकार बदलायचे आहे. सरकार बदलल्याशिवाय आपल्याला पाहिजे ते निर्णय घेता येणार नाहीत," असं शरद पवार म्हणाले.

सहा महिन्यात सरकार बदलयाचे आहे असं शरद पवार यांनी म्हणताच त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालीय. शरद पवारयाचे हे विधान विधानसभा निवडणुकीसंदर्भात असल्याचे म्हटलं जाता आहे. याबाबत माध्यमांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना प्रश्न विचारला होता. त्याबाबत बोलताना भुजबळ यांनी हे विधान गांभीर्याने घेतलं आहे. महायुतीतील पक्षांनी लवकात लवकर निर्णय घेण्याचा सल्ला भुजबळ यांनी दिला.

"लवकरात लवकर युतीतील पक्षांनी एकत्रित बसून तिकीट वाटपाचा निर्णय घ्यायला हवं. ७०, ८० जागा, बिग ब्रदर, छोटा ब्रदर, मधला ब्रदर जे काय असेल तर लवकर ठरवा. शरद पवार कामाला लागले आहेत. त्यांनी प्रचार सुरु केला असून, तशा प्रचाराला आपण सुरुवात करायला हवी. आपण परत तेच चर्चेचं गुऱ्हाळ सुरु ठेवलं तर अडचणी निर्माण होतील", असे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
 

Web Title: Minister Chhagan Bhujbal has taken Sharad Pawar statement about changing the government seriously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.