ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. ८ - : पंकजा मुंडे यांनी नामदेव शास्त्रींना धमकावल्याची क्लिप व्हायरल झाली आहे़ या क्लिपची सत्यता पडताळावी लागेल़ मात्र, मंत्रीच जर धमक्या देत असतील तर हे दुर्दैव आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली़नगर येथे शासकीय विश्रामगृहावर काँगे्रस कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली़ भगवानगडावरील दसरा मेळाव्या संदर्भात पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या बैठकीच्या आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत़ या क्लिपमध्ये ‘गडाचे महंत नामदेव शास्त्री यांचे काय करायचे ते दसऱ्यानंतर ठरवू’, असे वक्तव्य मुंडे यांनी केले आहे़ विखे म्हणाले, सध्याचे सरकार संवेदनाहिन आहे़ मंत्र्यांनीच असे धमावले असेल तर ती गंभीर बाब आहे़ मुख्यमंत्री मंत्र्यांवर पांघरुन घालत आहेत़ त्यांनी निर्णय घेण्याची गरज आहे़ परंतु ते निर्णयच घेत नाहीत़ मंत्री स्वैर झालेले आहेत़ प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार माजलेला आहे़ यात आदिवासी विकास खात्याने कळस गाठला आहे़
मंत्रीच धमकावताहेत हे दुर्दैव विखेंची मुंडेंवर टीका
By admin | Published: October 08, 2016 3:19 PM