मुंबई : भाजपाला साथ दिल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)च्या पारड्यात एक तरी कॅबिनेट मंत्रिपद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र मंत्रिपद मिळण्याआधीच रिपाइंतील वरिष्ठ नेत्यांमध्ये जुंपली आहे. सध्या कॅबिनेट मंत्रिपदासाठी अविनाश महातेकर आणि भूपेश थुलकर यांच्या नावाची चर्चा असून रिपाइंचे उपाध्यक्ष तानसेन ननावरे यांनी मात्र या दोघांच्या नावाला कडाडून विरोध केला आहे. आज थेट पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आठवले यांनी राज्यात मंत्रीपद स्वीकारावे, अशी मागणी ननावरे यांनी केली आहे. शिवसेनेच्या युतीनंतर घटक पक्षांच्या जाळ््यातही कॅबिनेट मंत्रिपदे पडण्याची चर्चा सुरू आहे. रिपाइंमध्ये मंत्रिपदावरून दोन गट पडल्याचे समोर येत आहे. (प्रतिनिधी)
मंत्रिपदावरून रिपाइंत जुंपली
By admin | Published: December 05, 2014 3:58 AM