शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

"लोकशाही संपली असं जाहीर करा, अन्यथा चंद्रकांत पाटील यांना न्यायालयाची माफी मागायला सांगा"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 4:17 PM

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची मागणी. चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांना जामीनावर सुटले असल्याचं सांगत जोरात बोलल्यास महाग पडेल असं केलं होतं वक्तव्य.

ठळक मुद्देछगन भुजबळ यांना जामीनावर सुटला आहात असं म्हणत इशारा दिला होता.न्यायालयाने सुमोटोअंतर्गत कारवाई करावी, मलिक यांची मागणी

"न्यायालयदेखील चंद्रकांतदादा पाटील यांच्या बोलण्यानुसार काम करत असतील तर लोकशाही कुठेतरी संपली असं जाहीर करा. नाहीतर चंद्रकांतदादा पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी," अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांना जामीनावर सुटला आहात असं म्हणत इशारा दिला होता. यावर नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे."भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अशा पद्धतीने बोलत असतील तर न्यायालयाने सुमोटोअंतर्गत कारवाई करावी," अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. "आजपर्यंत भाजपकडून संस्थांचा दुरुपयोग करण्यात येत आहे हे सिद्ध झालं आहे. आता न्यायालयसुद्धा त्यांच्या बोलण्यावर काम करतेय का?," असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे? अशी विचारणाही नवाब मलिक यांनी केली आहे.काय म्हणाले होते पाटील?छगन भुजबळ यांनी पश्चिम बंगालच्या निकालावर प्रतिक्रिया दिली होती. यात भुजबळ यांनी भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. "बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जवळपास दिवसाआड सभा घेत होते. त्यांचे ८ ते १० मंत्री मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. पण उपयोग झाला नाही. देशात आता भाजपविरोधी लाट तयार झाली आहे", असा टोला भुजबळ यांनी लगावला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ यांना थेट इशाराच दिला होता.  "छगन भुजबळ यांनी पंढरपूरच्या निकालावर प्रतिक्रिया द्यावी. तुम्ही जामिनावर सुटलेले आहात. तुम्ही काही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळे जास्त जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल तर पंढरपूर, पद्दुचेरी आणि आसामवर बोला", असं चंद्रकात पाटील म्हणाले होते. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलnawab malikनवाब मलिकChhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१