मुरलीधर भवार, डाेंबिवली: राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास त्यांच्याच गाेटात असंताेष तयार हाेईल असे विधान राट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यानी केले आहे. त्याला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रतिउत्तर देत कुठे तरी स्वतःचा टीआरपी वाढविण्याकरीता काही मंडळी अशी वक्तवे करीत असल्याची टिका केली आहे.
शहराच्या पश्चिम भागातील गजानन म्हात्रे क्रिडानगरीत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जिल्हास्तरीय कबड्डी सामन्यांचे आयाेजन भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी केले आहे. या सामन्यांचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या हस्ते काल सायंकाळी करण्यात आले. हे सामने येत्या १ फेब्रुवारी पर्यंत रंगणार आहेत. या प्रसंगी चव्हाण यांनी खडसे यांच्या टिकेला प्रतिउत्तर दिले. याप्रसंगी भाजप नेते जगन्नाथ पाटील हे देखील उपस्थित हाेते. मंत्री चव्हाण यांच्या हस्ते पद्मश्री गजानन माने यांचा सत्कार करण्यात आला.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खडसे यांनी केलेले वक्तव्य म्हणजे विरोधाला विरोध आहे. काही मंडळी अशी वक्तव्ये करत असतात. त्यातलेच हे एक वक्तव्य असावे असा टोला चव्हाण लगावला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे दोन्ही नेते महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात एक नंबरचा कसा होईल. यासाठी काम करीत आहेत याकडे चव्हाण यानी लक्ष वेधले.
हिंदू जनआक्रोश मोर्चा बाबत खडसे यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांचा हे वक्तव्य का केलं हा मला मोठा प्रश्न पडला आहे. कारण खडसे यांनी पूर्वी हिंदुत्वा संदर्भात त्यांनी अनेक वेळा सभागृहांमध्ये भर जाहीर सभांमध्ये बोलले आता पुन्हा त्यांचे मत का बदलले ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे असे चव्हाण यांनी ससांगितले.