शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

मंत्री सदाभाऊ खोत यांनी दादर मार्केटमध्ये विकली भाजी

By admin | Published: July 12, 2016 11:57 AM

महाराष्ट्राचे कृषी व पणन मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतक-यांच्या बाजूने उभे राहत दादर मार्केटमध्ये स्वत: भाजी विकली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ -  शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी आडत आता व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांचा संप सुरू असतानाच महाराष्ट्राचे कृषी व पणन मंत्री सदाभाऊ खोत मात्र शेतक-यांच्या बाजूने उभे असलेले दिसत आहेत. मंगळवारी पहाटे सदाभाऊ खोत यांनी दादरच्या प्लाझा भाजीपाला मार्केटमधअये जाऊन स्वत: भाजी विकली. 
पहाटे पाच वाजता मार्केटमध्ये आलेल्या खोत यांनी जुन्नरवरून १० टेम्पो घेऊन आलेल्या श्रीराम गाढवे या शेतक-याला भाजीपाल विकण्यासाठी स्वत: मदत केली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका मंत्र्याने दादर भाजीपाला मार्केटमध्ये जावुन शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी भाजी विकल्याची घटना घडली असून या कृतीद्वारे त्यांनी शेतक-यांना सरकार सदैव तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाहीच दिली. 
ना. सदाभाऊ खोत स्वत: विविध बाजारात भाजी मंडईत गेले व तेथे आलेल्या हिंदुराव शिळीमकर, राजेंद्र पवळे, रिंगे बुवा अशा महाराष्ट्राच्या विविध भागातुन आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीची चौकशी केली. तसेच येथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यास आपण सहकार्य करू व संरक्षणही देऊ, असे आश्वासनही खोत यांनी दिले.