ऑनलाइन लोकमतधुळे, दि. ७ : वयाच्या २८ व्या वर्षीच राज्याचे तत्कालिन कामगार राज्यमंत्री पीक़े़ अण्णा पाटील यांचा पराभव करून राजकारणात प्रवेश करणारे दोंडाईचा येथील राजघराण्याचे वारस जयकुमार रावल उद्या मंत्रीपदी विराजमान होणार आहेत़ आ़ रावल यांना कौटुंबिक राजकीय पार्श्वभुमी आहे़
आमदार जयकुमार रावल यांच्या परिवारात त्यांचे वडील सरकारसाहेब रावल, आई नयनकुवर रावल, पत्नी सुभद्राकुमारी रावल, मुलगी वेदांतेश्वरी कुमारी रावल व मुलगा जयअदित कुमार रावल यांचा समावेश आहे़ आमदार जयकुमार रावल यांनी आमदारकीची हॅट्ट्रीक केली असून त्यांनी शिंदखेडा तालुक्यात कृषी, शिक्षण, उद्योग, सिंचन या क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे़
तसेच भारतीय जनता पार्टीत देखील त्यांनी विविध मानाची पदे भुषविली आहेत़ आमदार रावल मंत्रीपदी विराजमान होत असल्याने केवळ शिंदखेडा तालुक्यालाच नव्हे तर खान्देशच्या विकासाला गती येईल, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला आहे़