मुंबई : येत्या हिवाळी अधिवेशनात दुष्काळासंदर्भात विविध वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे घेऊन दुष्काळासंदर्भात सरकारला जाब विचारा, असा जाहीर आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मंत्र्यांना दिला. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल आणि तो जनतेमध्ये फिरणारा असेल. केवळ इकडे-तिकडे फिरणारा नसेल, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.शिवसेनेच्या सत्तेतील सहभागाची वर्षपूर्ती आणि सेनेच्या १० मंत्र्यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन गुरुवारी रवींद्र नाट्यमंदिरात झाले. यावेळी उद्धव यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, दुष्काळग्रस्तांसाठी सरकारी योजनांची अंमलबजावणी होते का,याची पाहणी तर शिवसेना विरोधीपक्ष कसा ठरतो? जनतेसाठी रस्त्यावर आंदोलन करणारा शिवसैनिक हा मंत्री झाला आहे. जनतेने मोठ्या अपेक्षेने सत्तेत पाठवले आहे. त्यामुळे जनतेच्या आयुष्यात बदल झाला पाहिजे. डान्सबारला परवानगी व गणपती उत्सवात मात्र अनेक बंधने, यावर भाष्य करतांना उद्धव म्हणाले की, कोर्टात सरकारने बाजू ठामपणे मांडली पाहिजे. (प्रतिनिधी)नाव न घेता टोलेबाजीशिवेसेनेने सध्या दुष्काळाने होरपळून निघणाऱ्या मराठवाड्यावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र काहींना त्याचीही पोटदुखी झाली.दुष्काळग्रस्तांसाठी ९२० कोटी केंद्राकडून राज्याला मिळाले असे सांगण्यात येते. पण केंद्रीय म्हणतात अजून राज्यसरकारकडून दुष्काळग्रस्तांसाठी प्रस्तावच आलेला नाही. जनतेने नेमके काय समजायचे?भार्इंचा अहवाल सर्वांत लहानमंत्री रामदास कदम यांचा अहवाल सर्वांत लहान होता. मात्र तो छोटा असला तरी, त्यांचे कार्य मोठे असल्याचे प्रमाणपत्र थेट उद्धव यांनी देताच सभागृहात चांगलीच खसखस पिकली.ही वेगळी चूल नाहीजनतेसाठी केलेल्या कामाचा अहवाल जनतेसमोर मांडणे हा काय गुन्हा आहे का, असा सवाल करून आजचा सोहळा ही वेगळी चूल नाही. सरकार म्हणून आमचा चेहरा आम्ही यानिमित्त दाखवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्र्यांनो, सरकारला जाब विचारा - उद्धव
By admin | Published: December 04, 2015 3:10 AM