जमीर काझी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: गृह खात्यातील महत्त्वाचा विभाग असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असलेल्या निरीक्षकांच्या विशेष बदल्यांचे अधिकार आता या विभागाच्या मंत्र्यांना देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांकडे असलेले हे विशेष अधिकार आता खात्याच्या मंत्र्यांना मिळाल्याने उत्पादन शुल्क मंत्र्यांच्या अधिकारात वाढ झाली आहे. उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला अवैध व्यवसायावर छापे, तसेच मुद्देमालची जप्ती करण्याचे अधिकार असतात. त्यामुळे त्यांच्या विशेष बदल्यांच्या अधिकारातील बदल महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. उत्पादन शुल्क विभागातील बहुतांश निरीक्षक बदलीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सध्याच्या ठिकाणासाठीच इच्छुक असतात. तर महत्वाच्या ठिकाणची पोस्टिंग न मिळाल्याने किंवा एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणची पोस्ट काही कारणास्तव रिकामी झाल्यास त्या जागोयाठी ‘फिाल्डिंग’ लावली जाते. मात्र विशेष बदलीचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांनाच असल्याने त्यांच्यापर्यंत बदलीचा प्रस्ताव पाठवावा लागतो. त्यासाठी बराच पाठपुरावा करावा लागत असल्याने मुख्यमंत्र्यांचे हे अधिकार खात्याच्या मंत्र्यांना देण्यात यावा, असा प्रस्ताव बनविण्यात आला होता.
एक्साईज इन्स्पेक्टरच्या विशेष बदल्यांचे अधिकार मंत्र्यांना
By admin | Published: May 25, 2017 2:16 AM