पुणे -पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले आहे. याच मुद्द्यावर आज भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. "राज्यातील मंत्रीच बलात्कारी झाले आहेत आणि या बलात्कारी मंत्र्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना पाठबळ दिले जात आहे, असा गंभीर आरोप करत वाघ यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या. (The ministers in the state is the rapist; Attempt to save rapist ministers, attack by Chitra Wagh)
यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. प्रत्यक्षदर्शींच्या चौकशीचे काय झाले? मोबाईल, लॅपटॅापचे काय झाले, माहीत नाही. संजय राठोड हा आरोपी फरार असताना अहवाल दिलाच कसा? अशी विचारणा करत संजय राठोडच्या चौकशीशिवाय अहवाल पूर्ण होऊ शकत नाही. आधी त्याची चौकशी करा. सर्व पुरावे समोर आले असतानाही आरोपी सापडत नाही, असे म्हणत, पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचेही त्या म्हणाल्या.
“दरवाजा तोड अन् मोबाईल ताब्यात घे”; ‘ती’च्या आत्महत्येनंतर कथित मंत्र्याचा कार्यकर्त्याला आदेश
राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, असे मला अजूनही वाटते. बंजारा समाज हा राठोड यांच्यासोबत नाही. मला अनेकांचे फोन येत आहेत, पुजाला न्याय मिळवून द्या, अशी मागणी होत आहे, असेही वाघ म्हणाल्या.
चित्रा वाघ यांचे डीजीपींना निवेदन - पूजा चव्हाण या २२ वर्षीय युवतीच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. तिने आत्महत्या केली, गॅलरीतून पडून तिचा मृत्यू झाला असे पोलिसांनी म्हटले आहे. तिच्या आईवडिलांनी आमची कोणाबाबत तक्रार नाही असा जबाब दिला आहे. मुळची परळी येथील असलेली पूजा चव्हाण, इंग्लिश स्पिकिंग कोर्ससाठी पुण्यात गेली आणि तिने आत्महत्या केल्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणात शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने भाजपाने टीकेची झोड उठविली आहे. आज याप्रकरणात भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्र वाघ यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची भेट घेऊन संशयित मुख्य आरोपी मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करा यासंदर्भात निवेदन दिले आहे.
Pooja Chavan Suicide: मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करा; चित्रा वाघ यांचे डीजीपींना निवेदन