ठाणे : केंद्रीय मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून मंत्रालयातून अंबरनाथ येथे बदली करण्याकरिता आणि मुंबई आंतरराष्टÑीय विमानतळाला लागून असलेली जमीन मिळकत डेव्हलप करण्याकरिता एअरपोर्ट अॅथॉरिटीचा नाहरकत दाखला (एनओसी) मिळवण्याचे आमिष दाखवून मंत्रालयातील नगरविकास विभागाचे नगररचनाकार विद्यासागर चव्हाण (५४) यांना एका चौकडीने २३ लाखांचा गंडा घातल्याची बाब पुढे आली आहे. याप्रकरणी रामचरण गोहर ऊर्फ बाबाजी, धर्मेंद्र सिंग, मेहबूब शेख, मोहन झा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.
ठाण्यातील बाळकुम येथील रहिवासी असलेल्या चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंत्रालयात नगरविकास विभागात नगररचनाकार म्हणून नोकरी करत असताना दोन वर्षांपूर्वी ते खाजगी कामानिमित्त मीरा-भार्इंदर येथे गेले होते. तेथे त्यांची रणजित रामचरण गोहर ऊर्फ बाबाजी याच्याशी ओळख झाली. केंद्रीय मंत्रालयातील अधिकारी धर्मेंद्र सिंग, तसेच मुंबई व दिल्ली मंत्रालयातील सर्व अधिकाऱ्यांबरोबर जवळचे संबंध असल्यामुळे बदल्यांची कामे करत असल्याची बतावणी बाबाजीने केली होती. तुमचे बदलीबाबत किंवा इतर कोणतेही काम असल्यास सांगा, मी १०० टक्के करून देईल, असे बाबाजीने त्यांना आमिष दाखवले.
त्याचदरम्यान २०१७ मध्ये सिंग हे मुंबई येथे आले, तेव्हा बाबाजीने अंधेरीतील एका हॉटेलमध्ये ओळख करून दिली. त्यानंतर, सिंग हे पुन्हा मुंबईत आल्यावर त्यांनी फोन करून मंत्रालयात बोलावून घेतले. त्या ठिकाणी मंत्रालयातील सेक्रेटरी नितीन करीर यांना २८ लाखांचे घड्याळ भेट द्यायचे आहे. तुमची बदली मी करून देतो, त्याअगोदर तुम्ही मला घड्याळ घेण्यासाठी पैसे द्या, असे सांगितले. त्यानंतर, १८ लाख देण्याचे ठरले. ते पैसे सिंग यांचा मित्र आय.जी. पटेल याच्या गुजरात येथील दिलेल्या बँक खात्यावर पैसे पाठवण्याबाबत सांगितले. त्यानुसार, त्या बँक खात्यात जमा केले. त्यानंतर, डिसेंबर महिन्यात पुन्हा सिंग मुंबईत आल्यावर उर्वरित सहा लाखांची मागणी केल्यावर ती रक्कम बाबाजी याच्याकडे कापूरबावडीनाका येथे रोख स्वरूपात दिली. ११ डिसेंबर २०१७ रोजी मंत्रालयातील बदल्या झाल्या. मात्र, त्यात अंबरनाथ येथे दुसºया एका अधिकाºयाची बदली झाल्याने सिंग यांना विचारणा करून तुम्ही माझे पैसे मला परत द्या, तेव्हा सिंग याने ते खर्च झाले आहेत, तुम्ही दुसरे काही काम असेल तर सांगा, असे सांगून फसवणूक केल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.आणखी १२ लाख उकळलेचव्हाण यांनी त्यांचा मित्र शाह यांच्या आईच्या नावे आंतरराष्टÑीय विमानतळाला लागून जमीन आहे. ती मिळकत डेव्हलप करण्याकरिता एअरपोर्ट अॅथॉरिटीच्या एनओसीची गरज आहे. ती मिळवून द्या, असे सांगितले. त्यावेळी सिंग यांनी ते काम मोठे आहे. त्यासाठी आणखी पैसे लागतील, असे सांगितले. त्याच्या सांगण्यानुसार त्या कामासाठी मेहबूब शेख आणि मोहन झा यांना १२ लाख रुपये दिले. त्यानंतर, मोहन झा यांनी एअरपोर्ट अॅथॉरिटीचा बनावट ई-मेल आयडी व बोगस एनओसीचे पेपर्स बनवून फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले.