शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

अश्लील साईटच्या आहारी अल्पवयीन मुले

By admin | Published: June 27, 2014 11:01 PM

मोठय़ा शहरांसह ग्रामीण भागात स्मार्टफोन सहजपणो उपलब्ध झाल्यामुळे त्याचा आघात दहा ते 18 वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुला-मुलींच्या निरागसतेवर होत आहे.

पुणो : मोठय़ा शहरांसह ग्रामीण भागात स्मार्टफोन सहजपणो उपलब्ध झाल्यामुळे त्याचा आघात दहा ते 
18 वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुला-मुलींच्या निरागसतेवर होत आहे. त्यामुळे ही मुले अश्लील वेबसाईटच्या 
आहारी जात आहेत. शहरी भागात या मुलांकडून नेटचा वापर करण्याचे प्रमाण 6क् टक्के आहे. 
या प्रकारांमुळे भविष्यात मुलांची मानसिकता गुन्हेगारी वृत्तीची होण्याचा धोका नाकारता येत नाही, 
असे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
 
मुंबईतील कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टने नुकताच राज्यातील सहा जिल्ह्यांत ‘मोबाईल आणि इंटरनेटचा वापर आणि किशोरवयीन बालके’ या विषयावर सर्वेक्षण केले. त्यामध्ये 1क् ते 14 वयोगटातील 152 आणि 15 ते 19 वयोगटातील 336 मुलांकडून त्यांच्या इंटरनेट वापराविषयीच्या सवयींची माहिती घेण्यात आली. त्यातील 66 टक्के मुला-मुलींनी आपण अश्लील वेबसाईट पाहिल्याची कबुली दिली. तसेच, यातील काही मुला-मुलींनी मोबाईलवरून अशा प्रकारचे व्हिडीओ मित्र-मैत्रिणींना शेअर केल्याचेही सांगितले. अशा प्रकारे, पुण्यामध्येही अल्पवयीन मुला-मुलींमध्ये स्मार्ट फोन आणि इंटरनेट वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. 
पुण्यामध्ये शहर आणि ग्रामीण भागात पालकांकडून विद्याथ्र्याना अभ्यास किंवा अन्य कारणांनी इंटरनेटचा मुक्त वापर करण्याची परवागनी दिली जाते. मात्र, पालकांनी यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. पालक घरामध्ये नसताना विद्यार्थी तासन्तास इंटरनेटवर बसतात. 
मात्र, यातील गांभीर्य प्रकर्षाने पुढे 
येत आहे.
त्याचबरोबर पुण्यातील  ज्ञानदेवी संस्थेच्या शाळेत तयार करण्यात आलेल्या बालसेना ग्रुपने पोर्न साईट्स पाहण्यासंबंधीची माहिती ज्ञानदेवीकडे दिली आहे. त्यानुसार पोर्न साईट्स पाहण्यामध्ये 1क् वर्षापासूनची मुले-मुली यांचे प्रमाण वाढले 
आहे. त्यांच्यामध्ये काही विशिष्ट संकेतस्थळे अतिशय लोकप्रिय आहेत. या प्रकाराला मुख्यत्वेकरून ‘पिअरप्रेशर’ समवयस्कांचा दबावगटामुळेही मुले या प्रकारची संकेतस्थळे पाहत आहेत, अशी माहिती ज्ञानदेवीच्या बालसेना प्रमुखांनी ‘चाइल्डलाइन’ला सांगितली. शिवाय आज मोबाईलमुळे हातात इंटरनेट आले आहे. त्यामुळे अशा गोष्टी मुलांना सहजगत्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे अशा गोष्टींवर नियंत्रण मिळविणो सोपे नाही. (प्रतिनिधी)
 
नकळत्या वयातील प्रेमातून धक्का.
च्गेल्या काही महिन्यांमध्ये ज्ञानदेवी संचलित ‘चाइल्डलाइन’ला भेदरलेल्या मुली व पालकांचे फोन कॉल्स येत आहेत. पौगंडावस्थेतील- महाविद्यालयीन मुले  मुलींसोबत तथाकथित प्रेमात पडून मग मोबाईल किंवा इंटरनेटचा वापर करून मुलींचे नगA दृश्यफीत मागवून त्याचा गैरवापर करून मुलींकडून वेगवेगळ्या प्रकारची मागणी करत आहेत, तसेच काही जण याचा वापर करून मित्रंच्या ग्रुपसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचीही मागणी करत आहेत. यातील काही घटनांमध्ये मुली/पालक यांनी आत्महत्येच्या प्रय}ाचे पाऊल उचलल्याची माहिती डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे यांनी दिली.
च्चाइल्डलाइनला आलेल्या फोनमध्ये साधारण 13 ते 17 वयोगटातील आणि समाजातील सर्वच स्तरांतील मुलींचा व पालकांचा समावेश आहे. 
च्फोन करणा:यांमध्ये ब्लॅकमेल झालेले, कुटुंबात कळल्याची भीती वाटणारे, संस्काराशी झगडा होऊन समुपदेशनासाठी करणा:यांचा समावेश आहे. काही घटनांमध्ये मुली आणि मुलेही त्यांच्या समवयस्क मित्रंच्या दबावाला बळी 
पडत असल्याचेही निरीक्षण नोंदविले आहे.  
 
स्मार्ट फोन हातात नसला की, ही मुले अस्वस्थ होतात. टच स्क्रीन फोन तर त्यांना अधिक अधीर बनवत आहे. टॉयलेटमध्ये जातानाही स्मार्ट फोन सोबत घेऊन जातो, असे काही मुलांनी सांगितले. पालकांचे पाल्याकडे होत असलेले दुर्लक्ष हेच यास कारणीभूत आहे. पालकांनी पाल्यांच्या हातात कोणत्या वयात स्मार्ट फोन द्यावा, हे ठरवावे. स्मार्ट फोन घेऊन दिला तर इंटरनेटवर मुलगा काय करतो, यावरही जातीने लक्ष ठेवणो आवश्यक आहे. पालकाचे लक्ष असले तर धाकाने मुले अश्लील फोटो, व्हिडिओ डाऊनलोड करून घेणार नाहीत.- रेणुका कड, कार्यक्रम समन्वयक, कम्युनिटी ट्रस्ट 
 
इंटरनेट ऑडिक्शन
निरागस वयात अशा वेबसाईटबाबत उत्सुकता असते. त्यातच असे तंत्रज्ञान सहजपणो उपलब्ध झाले की, मुले भांबावून जातात. मात्र, पालकांनी त्यावर बंधने घातली तर अन्य ठिकाणाहून या वेबसाईट पाहिल्या जाऊ शकतात. अशा प्रकारच्या वेबसाईट पाहण्याचे नकारात्मक परिणाम विद्याथ्र्याच्या लक्षात आणून द्यावेत. मोकळे वातावरण ठेवल्यास विद्यार्थी त्यावर बोलण्यास कचरणार नाहीत. जागृती, वाईट परिणामांची जाणीव आणि सुसंवादाद्वारे प्रश्न सोडविता येईल.    - डॉ. किशोर गुजर, मानसोपचारतज्ज्ञ