नाशिक : अल्पवयीन विद्यार्थिनीला नियमितपणे शिकवणीसाठी घेऊन जाणाºया रिक्षाचालकाने तिच्यासोबत अश्लिल वर्तन करून विनयभंग केल्याची घटना नाशिकरोड परिसरात घडली आहे़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात रिक्षाचालक संशयित राजेंद्र पवार (५२, रा़चित्तरंजन सोसायटी, पवारवाडी, नाशिकरोड) विरोधात लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेलरोडच्या दसक परिसरात राहणाºया पंधरा वर्षीय अलपवयीन मुलीस संशयित रिक्षाचालक राजेंद्र पवार हा १७ आॅक्टोबरपासून नियमितपणे आपल्या रिक्षातून (एमएच १५ ईएच २०३९) खासगी शिकवणीसाठी घेऊन जात होता़ अल्पवयीन विद्यार्थिनी घरातून शिकवणीसाठी रिक्षात बसल्यानंतर संशयित पवार हा तिच्यासोबत अंगलट तसेच अश्लिल चाळे व वर्तन करीत होता़ या मुलीसोबत बोलतानाही अश्लिल भाषेचा वापर करीत होता़ याबाबत संबंधित मुलीने आपल्या पालकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी गंभीर दखल घेतली़यानंतर पिडीत मुलीने उपनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिल्यानंतर संशयित राजेंद्र पवार विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे़ या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक तेली करीत आहेत़
अल्पवयीन विद्यार्थिनीचा रिक्षाचालकाने केला विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 1:51 PM
नाशिक : अल्पवयीन विद्यार्थिनीला नियमितपणे शिकवणीसाठी घेऊन जाणाºया रिक्षाचालकाने तिच्यासोबत अश्लिल वर्तन करून विनयभंग केल्याची घटना नाशिकरोड परिसरात घडली आहे़
ठळक मुद्देनियमितपणे शिकवणीसाठी घेऊन जाणारा रिक्षाचालकमुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा ; उपनगर पोलीस