शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
4
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
5
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
6
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
7
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
8
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
9
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
10
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
11
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
12
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
13
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
15
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
16
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
17
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
18
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
19
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
20
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By admin | Published: April 25, 2017 12:10 AM

एका पंधरावर्षीय मुलीची फसवणूक करून तिला खोलीत डांबून ठेवून सहा आरोपींनी तिच्यावर दोन दिवस बलात्कार केला.

अंबरनाथ : एका पंधरावर्षीय मुलीची फसवणूक करून तिला खोलीत डांबून ठेवून सहा आरोपींनी तिच्यावर दोन दिवस बलात्कार केला. तिची सुटका करताना याबाबत वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मुलीने घरात हा संपूर्ण प्रकार सांगितल्यावर आरोपींविरोधात अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला व चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. अंबरनाथमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या या शालेय विद्यार्थिनीला तिच्या मित्रांपैकी एकाने आपला दुसरा मित्र आजारी असल्याची बतावणी करून न्यू बालाजीनगर परिसरात नेले. तेथील एका खोलीत तिला डांबून ठेवण्यात आले. जो मित्र आजारी आहे, असे सांगण्यात आले होते, तो मित्र त्या खोलीत नव्हताच. ज्या तरुणाने तिची फसवणूक केली, त्याच्यासह ६ तरुणांनी तिच्यावर दोन दिवस बलात्कार केला. तिची सुटका करताना ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार पीडित मुलीने आपल्या घरच्यांना सांगितल्यावर पालकांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये नितीन सानप (२१), कुशल बालकवडे (२०), गोविंद कोळी (२१) दिलीप महाडिक (२६) यांचा समावेश आहे. उर्वरित दोन आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)