शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

नागपूरच्या आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2017 9:03 PM

नागपूरच्या आमदार निवासात एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी तीन दिवस अत्याचार केल्याची घटना उघडकीस

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 20 - सराफा दुकानात काम करणाºया एका तरुणीवर सराफा व्यापारी मनोज विनोद भगत (४४) तसेच तरुणीचा मित्र रजत तेजलाल मगरे (१९) या दोघांनी सतत चार दिवस सामूहिक बलात्कार केला. आमदार निवासाच्या खोली क्रमांक ३२० मध्ये ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणाचा बोभाटा झाल्याने प्रशासकीय यंत्रणेत प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

गिट्टीखदान चौकात पीपी ज्वेलर्स आहे. येथे पीडित तरुणी कामावर होती. भगत याच्याशी चांगले संबंध असल्यामुळे त्यांच्याकडे तिचे अन् तिच्या घरी अधून मधून मालकाचेही जाणे येणे होते. १३ एप्रिलला आरोपी भगत पीडित तरुणीच्या घरी पोहचला. मित्र आणि पारिवारिक सदस्यांसह आम्ही आग्रा येथे फिरायला जात असून, हिलासुद्धा (तरुणीला) सोबत नेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्यावर विश्वास असल्यामुळे पालकांनी तिला आग्रा येथे जाण्यास अनुमती दिली. त्यानंतर १४ एप्रिलला सकाळी भगत आणि पीडित मुलीने पालकांना फोन करून आग्रा येथे पोहचल्याचे सांगितले. त्यानंतर चौथ्या दिवशी भगत तरुणीच्या घरी पोहचला. तुमची मुलगी चार दिवसांपासून दुकानात आली नाही अन् तिचा संपर्कही नाही, असे त्याने पालकांना सांगितले. त्यावर संतप्त पालकांनी भगतची खरडपट्टी काढली. तुम्ही तिला सोबत नेले होते, आता कुठे आहे, अशी विचारणाही केली. त्यामुळे पालकांनी सरळ गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तरुणीच्या अपहरणाची १८ एप्रिल रात्री तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोधाशोध सुरू केली. त्यानंतर भगतची चौकशी केल्यानंतर तरुणीच्या मित्राचे नाव पुढे आले. पोलिसांनी त्यालाही ठाण्यात आणले.
 
तिला रेल्वेतून उतरवले-
उशिरा रात्रीपर्यंत हे सर्व सुरू असताना तरुणीच्या मित्राने ती रेल्वेमधून बाहेरगावला जात असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेच इकडे तिकडे धावपळ करून तरुणीला कामठी स्थानकावर उतरवून घेतले. त्यानंतर तिला गिट्टीखदान ठाण्यात आणण्यात आले. तोपर्यंत भगत आणि तरुणीचा मित्र मगरे हे एकमेकांवर आरोप करीत असल्याने या प्रकरणातील भलतीच माहिती उजेडात आली. तिला पोलिसांनी विचारणा केली असता तिने या दोघांच्याही पापाची वाच्यता केली. 
 
अशी घडली घटना-
आरोपी भगतने तरुणीच्या पालकाला आगरा येथे जायचे आहे, असे सांगून घरच्यांची परवानगी घेतल्यानंतर आधीच ठरल्याप्रमाणे हे दोघे आरोपीच्या कारने आमदार निवासाच्या पार्किंगस्थळी पोहचले. तेथे कार उभी केल्यानंतर या दोघांनी शरीरसंबंध प्रस्थापित केले. काही त्यानंतर आरोपीला आमदार निवासाच्या रूम नंबर ३०१ ची चावी मिळाली. रूममध्ये रात्रभर पुन्हा अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर सकाळी आरोपी निघून गेला तर, या सर्व प्रकाराची आधीच माहिती असल्यासारखा तरुणीचा मित्र मगरे आमदार निवासात पोहचला. त्याने दिवसभर तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. पुढचे दोन दिवस मित्र निघून गेला की भगत आणि भगत निघून गेला की मगरे तेथे पोहचत होता आणि तरुणीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करीत होता. हे सर्व करताना दोन्ही आरोपींनी ‘तू त्याला हात कशाला लावू दिला’ अशी विचारणा करून तरुणीला जाब विचारणे सुरू केले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला अन् या प्रकरणाचा बोभाटा झाला. स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी आरोपी भगत दारूच्या नशेत तरुणीच्या घरी पोहचला अन् त्याचमुळे या प्रकरणाचे बिंग फुटले. 
 
संशयास्पद गोपनीयता-
या प्रकरणात पोलिसांनी बाळगलेली गोपनीयता संशयास्पद ठरली आहे. आमदार निवासासारख्या संवेदनशील ठिकाणी तब्बल चार दिवस एका तरुणीवर आळीपाळीने दोन आरोपी बलात्कार करतात हे उघड झाल्यानंतर पोलीस त्या दोघांनाही अपहरण करून सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली अटक करतात. त्यांना बुधवारी कोर्टात हजर करून त्यांचा तीन दिवसांचा पीसीआरही मिळवतात. मात्र, प्रसारमाध्यमच काय, पोलिसांच्या माहिती कक्षालाही त्याची माहिती देण्याची तसदी घेत नाही. ही गोपनीयता पोलिसांनी कोणत्या कारणामुळे बाळगली, असा प्रश्न चर्चेला आला आहे.