लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वडिलांचे चारित्र्य चांगले नसल्याचा ठपका सरोगेट आईने ठेवल्याने उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीचा ताबा तिच्या वडिलांकडे देण्यास नकार देत, आईकडेच मुलीला ठेवण्याचा आदेश दिला. मुलीचे वडील इराणचे नागरिक आहेत.मुलीच्या वडिलांनी उच्च न्यायालयात हॅबिस कॉर्पस (हरवलेली व्यक्ती हजर करण्यासाठी केलेली याचिका) दाखल केली. त्यावरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती. पोलिसांचा अहवाल व सरोगेट आई व मुलगी राहत असलेल्या शांती सदन वसतिगृहाच्या अधीक्षकाचा अहवाल वाचल्यानंतर खंडपीठाने मुलीला आईकडेच ठेवणे योग्य असल्याचे म्हटले. दोन्ही पालकांना तिला भेटता येईल. तिच्या हितासाठी तिला चांगल्या संस्थेत ठेवणार की नाही, याबाबत न्यायालयाने आईकडे विचारणा केली. अतिरिक्त सरकारी वकिलांना चांगल्या संस्थांची किंवा बोर्डिंगची नावे पुढील सुनावणीत सादर करण्याचे निर्देश दिले.
‘अल्पवयीन मुलीचा ताबा सरोगेट आईकडे’
By admin | Published: May 12, 2017 3:25 AM