शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

अल्पसंख्याक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून दूरच : खासदार हुसेन दलवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 3:23 AM

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. शिष्यवृत्तीअभावी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात विविध अडथळे येतात.

मुंबई : अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. शिष्यवृत्तीअभावी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात विविध अडथळे येतात. याबाबतची असंख्य प्रकरणे समोर आल्याचे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितले. रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील अंजूमन-ए-इस्लाम महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. या वेळी मौलाना आझाद विचार मंचाचे उपाध्यक्ष करीम सालार आणि सच्चर कमिटीचे माजी सदस्य सचिव अबू सालेह शरीफ यांची उपस्थिती होती.दलवाई पुढे म्हणाले की, अल्पसंख्य समाजांमधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्तींची अत्यंत गरज असते. शासनाने या विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती पोहोचविण्यासाठी सुविधा पुरवणे आवश्यक आहे. यासंबंधीची कार्यवाहीदेखील किचकट असल्याने शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात अनंत अडथळे येतात. त्यामुळे संपूर्ण कार्यवाही आॅनलाइन व्हावी, यासाठी पाठपुरावा आता करणार आहोत....म्हणून मुस्लिमांमध्ये बालकामगार-आर्थिकदृष्ट्या दुर्बलतेमुळे अधिकांश मुस्लीम विद्यार्थी शिक्षणापसून वंचित राहतात. त्यामुळे मुस्लिमांमध्ये बाल कामगारांचे प्रमाण अधिक असल्याचे मत दलवाई यांनी मांडले. तसेच ओबीसीमध्ये मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी दलवाई यांनी या वेळी मांडली.आर्थिकदृष्ट्या उच्चवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मुस्लीम अशा तीन प्रकारांमध्ये ओबीसी आरक्षणाची विभागणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या वेळी मांडली.तसेच अल्पसंख्याकांसाठी असलेल्या विविध निधी, शिष्यवृत्त्यांबाबत लोकांमध्ये प्रबोधन व्हावे, यासाठी मौलाना आझाद विचार मंचाचे राज्यभरातील कार्यकर्ते सर्वत्र जनजागृती करणार असल्याचेही दलवाई यांनी सांगितले.