मुंबई : फ्रान्सकडून राफेल जेट विमान खरेदीत तब्बल ४१ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. मात्र, राष्ट्रीय सुरक्षेचे कारण पुढे करत भाजपा सरकार विमानाची खरी किंमत जनतेपासून लपवत आहे. खरेदीतील गैरव्यवहारामुळेच जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आदी नेत्यांनी राफेल खरेदीतील कथित घोटाळ्याबाबत गुरुवारी पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार टीका केली. काँग्रेस सरकारच्या काळात एका राफेल जेट विमानाची किंमत ५२६ कोटी ठरविली होती. मोदी सरकारने मात्र एक विमान १६०० कोटी रुपयांना खरेदी केले. या खरेदी व्यवहारात अनियमितता आहे. इजिप्त आणि कतार या देशांनी खरेदी केलेल्या एका राफेलची किंमत भारत सरकारने खरेदी केलेल्या जेटहून ३५० कोटी कमी आहे. या सर्व व्यवहारात पारदर्शकता नाही. पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन प्रकरण दडवित आहेत, असा आरोप चव्हाण यांनी केला.राफेल जेट विमान खरेदीत ४१,२०५ कोटींचा घोटाळा झाला. याविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी ३० जुलैला मुुंबईतील फॅशन स्ट्रीट ते आझाद मैदान असा मोर्चा काढेल. काँग्रेसतर्फे देशभर असेच मोर्चे काढले जातील, असे निरुपम यांनी सांगितले.याचा अर्थ निवडणुका जवळ आल्याआर्थिक निकषावरून आरक्षण देण्याच्या मागणीबाबत विचारले असता, मागासलेल्या जाती जोपर्यंत मुख्य प्रवाहात येत नाही तोपर्यंत आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा निर्णय घेणे योग्य नसल्याचे अशोक चव्हण यांनी स्पष्ट केले. तर, उद्धव ठाकरे यांनी वाराणसीला जाणार असल्याचे पोस्टर लावले आहेत. ते हिंदुत्वाकडे वळत आहेत याचा अर्थ निवडणुका जवळ आल्या आहेत, अशी टिप्पणी चव्हाण यांनी केली.
सुरक्षेच्या नावाखाली जनतेची दिशाभूल; काँग्रेसचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 6:12 AM