मुंबई - Sanjay Raut on BJP ( Marathi News )आम्ही जी तयारी केलीय ती किमान ३५ ते ४० जागांसाठी आहे. काही प्रमुख नेते शिवसेनेत किंवा महाविकास आघाडीत प्रवेश करणार आहेत. त्यानंतर गणिते बदलणार आहे. लोकसभेच्या किमान ४० जागांवर आम्ही जिंकू हा विश्वास आहे असं विधान उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, हा सर्व्हे आलाय तो पहिल्या टप्प्यातील असेल.अजून बरीच गणिते बदलणार आहेत. भाजपा ४८ हून अधिक जागा जिंकेल.कारण भाजपा हा हवेतला पक्ष आहे. जमिनीवरचा नाही. जो पक्ष मिंदे आणि अजित पवारांच्या कुबड्यांवर उभे आहेत त्यांनी ४८ जागा जिंकण्याचा दावा करू नये. आमची क्षमता ४० पेक्षा जास्त जागा जिंकण्याची आहे. मिशन ४० + हा आमचा दावा नसून तो आत्मविश्वास आहे असं त्यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरे सर्वमान्य नेते
उद्धव ठाकरेंना मानणारा देशात मोठा वर्ग आहे. देशात ज्याप्रकारे हुकुमशाही सुरू आहे. त्याविरोधात उघडपणे मैदानात उतरून उद्धव ठाकरे लढतायेत. उद्योगपती अदानींविरोधात सगळेच बोलतात पण मुंबईच्या रस्त्यावर लाखोंचा मोर्चा ठाकरेंनी काढला. अदानी म्हणजे मोदी हे सगळ्यांना माहिती आहे. आम्ही रस्त्यावर उतरलोय, राहुल गांधींनंतर उघडपणे बेधडकपणे उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरून लढतायेत. त्यामुळे ठाकरे देशात सर्वमान्य नेते आहेत. इंडिया आघाडीचे सगळेच नेते उद्धव ठाकरेंचा आदर करतात. दिल्लीत अनेक नेते उद्धव ठाकरेंना भेटले असं राऊतांनी सांगितले.
लवकरच वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांशी चर्चा
बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे. बाळासाहेबांची आणि आमची भूमिका सारखीच आहे. देशात संविधान टिकावे, लोकशाही टिकावी. मोदींची हुकुमशाही संपवावी असं मानणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत. आमची त्यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू आहे. लवकरच वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि महाविकास आघाडीचे नेते एकत्रित बसणार आहेत. काँग्रेसच्या स्थापनादिवसानिमित्त काही नेते व्यस्त आहेत. प्रकाश आंबेडकर असा कुठलाही निर्णय घेणार नाहीत ज्यामुळे हुकुमशाहीचे हात बळकट होतील. शिवसेनेच्या बरोबरीने महाराष्ट्रात मोदींच्या हुकुमशाहीविरोधात हल्ले करत असतील तर ते प्रकाश आंबेडकर आहेत. संविधान बचाव संघर्ष, हुकुमशाहीविरोधात त्यांची भूमिका अत्यंत परखड आहेत. प्रकाश आंबेडकर काही चुकीचा निर्णय घेतील हे महाराष्ट्र किंवा देशाला वाटत नाही असं संजय राऊत म्हणाले.
सरकारचं लक्ष विरोधकांना नामोहरण करायचं
आपले जवान शहीद होतायेत, पोलिसांची हत्या होतेय. हे सरकारला काश्मीरची परिस्थिती नियंत्रणात आहे हे कशावरून दावा करतायेत? पूंछच्या हल्ल्याला जबाबदार कोण? २५-३० बड्या लष्करी अधिकाऱ्यांचे बलिदान गेलंय. सरकार ईडीचा दुरुपयोग, विरोधकांवर हल्ले करण्यात व्यस्त आहे. काश्मीरची अवस्था सुधारणार कोण? यावर बोलायला हवं. मेहबूबा मुफ्ती यांनी जे म्हटलं ते योग्य आहे अशी प्रतिक्रिया राऊतांनी काश्मीरमधील परिस्थितीवर दिली आहे.