विशेष प्रतिनिधी मुंबई : कोल्हापूर अंबाबाईला घागरा-चोळी नेसवणाºया पुजाºयांना बदलण्याची मागणी करीत सर्वपक्षीय आमदार आज विधानसभेत आक्रमक झाले. यासंदर्भात राजेश क्षीरसागर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. आमदारांच्या चौफेर शाब्दिक हल्ल्यानंतर येत्या १५ दिवसांत यासंदर्भात संबंधितांची बैठक घेण्याचे आश्वासन गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले.राजेश क्षीरसागर चंद्रदीप नरके, हसन मुश्रीफ, नितेश राणे, प्रकाश अबिटकर यांनी चर्चेत भाग घेतला. कोल्हापूरच्या या देवस्थानात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा असून त्याची चौकशी तातडीने पूर्ण करून संबंधितांवर कारवाईची मागणीही यानिमित्ताने पुढे आली.पंढरपूर व शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर अंबाबाई मंदिरातदेखील वारसा हक्काने पुजारी नेमण्याऐवजी शैक्षणिक पात्रतेच्या आधारे पुजारी नेमण्यासंदर्भात विचार सुरू आहे. त्याबाबत पुजारी आणि कोल्हापूरकरांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. यासंदर्भात कायदा करण्यासाठी सरकारने गेल्या महिन्यात समिती स्थापन केली आहे.अंबाबाई मंदिरातील पुजाºयांकडून देवीच्या गाभाºयात देणगी स्वरूपात येणारे दागदागिने, मौल्यवान वस्तू, साड्या, वस्रांचा हिशेबच ठेवला जात नाही. तेथील व्यवहारात कुठलीही पारदर्शकता नाही.संपूर्ण कोल्हापूरकरांसाठी हा अत्यंत नाराजीचा विषय आहे. गाभाºयातील वस्तू पुजारी लांबवतात. आणि गाभाºयाबाहेरच्या वस्तूंवर समितीचे लोक डल्ला मारतात, असा हल्ला राजेश क्षीरसागर यांनी केला.
पुजारी बदलण्यावरून आमदार आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 4:21 AM