तुमसर (भंडारा) : पोलीस शिपाई मारहाण प्रकरणी भंडाऱ्याचे आमदार रामचंद्र अवसरे यांनी आज शनिवारी दुपारी २च्या सुमारास तुमसर पोलीस ठाण्यात हजेरी लावली. पोलीस निरीक्षकांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. याप्रसंगी तुमसर पोलीस ठाण्यात अतिरिक्त पोलिसांच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.तुमसरात बुधवारी तिरंगा यात्रेचा सांगता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान आमदार अवसरे यांचा वाहनचालक तुलाराम सेलोकर रस्त्यावर वाहन उभे करून कार्यक्रमाचे फोटो काढत होता. पोलीस कर्मचारी राजू साठवणे यांनी सेलोकर यास दमदाटी करून मारहाण केली, अशी तक्रार तुलाराम याने अवसरे यांच्याकडे केली. अवसरे यांनी पोलीस कर्मचारी साठवणे यास पोलीस ठाण्यात तुलाराम यास का मारले, असा प्रश्न विचारून थोबाडात मारली होती. या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याच्या तीन दिवसांनंतर अवसरे पोलीस ठाण्यात हजर झाले. (प्रतिनिधी)सर्वाेच्च न्यायालयाने कलम ४१ अ प्रमाणे या प्रकरणात सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे, तिथे आरोपीला अटक करू नये असे निर्देश दिले आहेत. त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे. त्या अनुषंगाने अवसरे यांनी तुमसर पोलीस ठाण्यात हजर राहावे, असे पवनी पोलिसांना कळविण्यात आले होते. त्यामुळे अवसरे तुमसर पोलीस ठाण्यात हजर झाले.- राजेंद्र शेट्टे, पोलीस निरीक्षक, तुमसर
आमदार अवसरे पोलीस ठाण्यात हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2016 1:59 AM