मुंबई - पैठण मतदारसंघ युती धर्मानुसार सेनेला सुटला आहे. मात्र असे असतानाही भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी निवडणूक लढवणारच ही भूमिका घेतल्याने राजकीय वातवरण तापले आहे. तर लोकशाहीने निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे कुणीही निवडणूक लढवू शकतो. मात्र ज्याप्रमाणे आम्ही लोकसभेत युती धर्म पाळत भाजपचे काम केले. त्याचप्रमाणे विधानसभेत भाजप नेते सेनेचा काम करायाल तयार आहे. असे असतानाही जर गोर्डेंची इच्छा असेल तर त्यांनी खुशाल लढाव, मला काहीच फरक पडत नाही असा टोला शिवसेना आमदार संदीपान भूमरेंनी लगावला आहे.
पैठण मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेत. दत्ता गोर्डे यांच्या निवडणूक लढणारच ह्या भूमुकेमुळे युतीत बिघाड होण्याची शक्यता आहे. यावरून आमदार भूमरेंनी गोर्डेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. युतीच्या नियमानुसार लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपचे उमदेवार रावसाहेब दानवे यांचे काम केले. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेते आणि पदाधिकारी पैठण मतदारसंघात शिवसनेचे काम करायाल तयार आहेत. मात्र असे असतानाही भाजपमधील काही लोकांना बंडखोरीकडून निवडणूक लढवण्याची इच्छा असतील, तर त्यांनी खुशाल लढाव, असे भुमरे म्हणाले.
पैठण मतदारसंघात मागील दोन निवडणुकीत शिवसेना आमदार संदीपान भुमरे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्यात थेट लढत झाली होती. २०१४ मध्ये भुमरे हे चौथ्यांदा पैठणमधून निवडून आले होते. भुमरे यांची मतदारसंघात चांगली पकड आहे. मात्र पैठण शहर सोडले तर तालुक्यात गोर्डे यांचा भुमरे यांच्याप्रमाणे जनसंपर्क नाही. त्यात विद्यमान आमदार असलेल्या ठिकाणी युतीच्या जागावाटपात फेरबदल होणार नसल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे गोर्डे यांना निवडणूक लढाईची असेल तर त्यांना अपक्ष उभा राहावे लागणार हे स्पष्ट आहे.
संदीपान भुमरे ( शिवसेना आमदार पैठण )
प्रत्येक विधानसभा निवडणुकीत अनेक नवीन उमदेवार उभे राहतच असतात, ते काही नवीन नाहीत. त्यामुळे कोण उभा राहत आहे याने मला काहीच फरक पडत नाही. युतीने उमदेवारी दिली तर लढवेल आणि जिंकेल ही.