आमदार अपात्रता सुनावणी उद्यापासून पुन्हा सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 09:48 AM2024-01-03T09:48:04+5:302024-01-03T09:48:47+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, नार्वेकर यांना ३१ जानेवारीपूर्वी याबाबतचा निर्णय द्यावा लागणार आहे.
मुंबई : आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर गुरुवारी ४ जानेवारीपासून पुन्हा सुनावणी सुरू होत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाची सुनावणी संपली असून, आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांची सुनावणी होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, नार्वेकर यांना ३१ जानेवारीपूर्वी याबाबतचा निर्णय द्यावा लागणार आहे.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने आमदार अपात्रतेच्या नोटिशीला उत्तर सादर केले आहे, पण अजित पवार गटाने एक महिन्याची वेळ मागून घेतली होती. त्यामुळे आता अजित पवार गटाकडून नेमके कसे उत्तर देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, दोन्ही गटांकडून कोणाच्या साक्षी होतात, यावर सुनावणीची पुढील दिशा ठरणार आहे.