आमदार गोपीचंद पडळकरांची अजित पवारांवर बोचरी टीका; भाजप-राष्ट्रवादीत वादाची नवी ठिणगी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 05:25 PM2023-09-18T17:25:05+5:302023-09-18T17:26:48+5:30

अजित पवार सत्तेत सहभागी झाले असतानाही गोपीचंद पडळकरांनी टीका केल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

MLA Gopichand Padalkar criticizes Ajit Pawar; A new spark of controversy in BJP-NCP | आमदार गोपीचंद पडळकरांची अजित पवारांवर बोचरी टीका; भाजप-राष्ट्रवादीत वादाची नवी ठिणगी

आमदार गोपीचंद पडळकरांची अजित पवारांवर बोचरी टीका; भाजप-राष्ट्रवादीत वादाची नवी ठिणगी

googlenewsNext


भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि पवार घराण्यातील वाद सर्वश्रुत आहे. पडळकरांनी अनेकदा पवार घराण्यावर टीका केली आहे. आता अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत सत्तेत आले आहेत, अशावेळी पडळकरांच्या एका वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. 

आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून धनगर समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की, तुम्ही अजित पवारांना पत्र का पाठवलं नाही? त्यावर पडळकर म्हणाले की, 'अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे', अशी टीका त्यांनी यावेळी केली. पडळकरांनी सुप्रिया सुळे यांनाही लबाड लांडग्याची लेक, म्हटले. 

अजित पवारांची आमच्या विषयी स्वच्छ भावना नाही, त्यामुळे आम्ही त्यांना पत्र देण्याची गरज नाही. ते लबाड लांडग्याचे लबाड पिल्लू आहे. त्यांना आम्ही मानत नाहीत. त्यामुळे मी त्यांना आम्ही कधी पत्र दिले नाही आणि पुढेही पत्र देण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो त्यांना मी पत्र दिले आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला. तुमच्या पालख्या आमच्या समाजाने वागवल्या. लोकांच्या चपल्या फाटल्या. तुमच्या बापाने, तुम्ही, तुमच्या भावाने, पुतण्याने कुणीच तिकडे बघितलं नाही. तुम्ही जास्त पुळका आणण्याची गरज नाही. आमची लोकं सगळी हुशार झाली आहेत. लोकांची त्यांच्या विषयीची भावना ही त्यांनाही माहिती आहे. सुप्रिया सुळे, शरद पवार, अजित पवार काय बोलले, याला आम्ही किंमत देत नाहीत, अशी खोचक टीकाही पडळकरांनी केली.

Web Title: MLA Gopichand Padalkar criticizes Ajit Pawar; A new spark of controversy in BJP-NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.