शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

आमदार प्रणिती शिंदे अडचणीत; सोलापूरच्या न्यायालयाने काढले वॉरंट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 1:10 PM

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घालून धक्काबुक्की केलेले प्रकरण; माजी आमदार प्रकाश यलगुलवारसह सात जणांना दोन दिवस जामीन वाढविला

ठळक मुद्दे- खटल्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याबद्दल मुख्य न्यायदंडाधिकाºयानी काढले वॉरंट- जामीन मिळविण्यासाठी लवकरच अर्ज करणार असल्याची अ‍ॅड़ मिलिंद थोबडे याची माहिती

सोलापूर : जिल्हा नियोजन बैठकीच्या वेळेस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करताना धक्काबुक्की करून पोलिसाला जखमी केल्याप्रकरणी न्यायालयात दाखल असलेल्या खटल्याच्या तारखेला हजर न राहिल्याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे यांना मुख्य न्यायदंडाधिकाºयांनी जामिनपात्र वॉरंट बजावले आहे. तसेच या प्रकरणात न्यायालयात हजर झालेल्या माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह सात जणांना सत्र न्यायालयाने आणखी दोन दिवस अंतरिम जामीन वाढवून दिला आहे. 

जिल्हा नियोजन समितीची २ जानेवारी २0१८ रोजी बैठक होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जात असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी औषधोपचारावर झालेली दरवाढ रद्द करा, अशी घोषणाबाजी करीत गाडी अडवून घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांबरोबर कार्यकर्त्यांनी हमरीतुमरी करून ढकलाढकली केली. यात पोलीस कर्मचारी खाली पडून जखमी झाला. या प्रकरणी आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्यासह आंदोलकांवर सदर बझार पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. 

या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, केशव इंगळे, राहुल वर्धा, बशीर शेख, करीम शेख हे सात जण मुख्य न्यायदंडाधिकारी खेडेकर यांच्यासमोर हजर झाले. न्यायदंडाधिकाºयांनी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. त्यावर आरोपीच्या वकिलांनी अंतरिम जामिनावर युक्तिवाद करताना आरोपी माजी आमदार, बँकेचे चेअरमन आहेत असे निदर्शनाला आणले. त्यावर न्यायदंडाधिकाºयांनी आरोपींना २७ आॅगस्टपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. त्यावर रात्री उशिरा आरोपींना जामिनावर सोडण्यात आले. त्यावर आरोपींनी मंगळवारी अ‍ॅड. प्रवीण शेंडे, अ‍ॅड. अमित आळंगे, अ‍ॅड. भीमाशंकर कत्ते, अ‍ॅड. एस. एस. कालेकर यांच्यामार्फत मुख्य न्यायदंडाधिकाºयांच्या आदेशाविरूद्ध सत्र न्यायाधीश आवाड यांच्या न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल करून त्यावर न्यायाधीशांनी सरकारी वकिलांचे म्हणणे दाखल करण्यासाठी २९ आॅगस्टपर्यंत आरोपींना अंतरिम जामीन मंजूर केला.

अन् निघाले दोघांविरूद्ध वॉरंट- खटल्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याबद्दल मुख्य न्यायदंडाधिकारी खेडेकर यांनी आमदार प्रणिती शिंदे व नगरसेवक चेतन नरोटे यांच्याविरूद्ध जामिनपात्र वॉरंट काढल्याचे अ‍ॅड. मिलींद थोबडे यांनी सांगितले. न्यायालयाच्या वॉरंटनुसार या प्रकरणात जामीन मिळविण्यासाठी लवकरच न्यायालयात अर्ज करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयPraniti Shindeप्रणिती शिंदेvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक