मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार रमेश कदम याला मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रत्नागिरी येथे ही घोषणा केली. निलंबनाची कारवाई करण्यापूर्वी साधारणत: कोणालाही पक्षाकडून आधी कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. संबंधितांचा खुलासा समाधानकारक नसल्याचे पक्षाला वाटले तर निलंबनाची कारवाई केली जाते. मात्र, कदम यांच्याबाबत असे काहीही न करता त्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचा निर्णय आपण घेतला, असे तटकरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अधिकारी कदम याला बचावाची कोणतीही संधी मिळू नये यासाठी खूपच काळजी घेणार आहेत. या प्रकरणी कदमची रोज किमान ५-६ तास चौकशी होईल. त्याचे व्हिडिओग्राफींग केले जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)नेरूळ पोलीस ठाण्याच्या कोठडीत कदमने संपूर्ण रात्र काहीही खाल्ले नाही. त्याने सतत मला चांगल्या जागेत व जेथे पंखा आहे तेथे ठेवावे अशी मागणी केली. मंगळवारी जेव्हा त्याला चौकशीसाठी सीआयडी कार्यालयात आणण्यात आले तेव्हाही त्याने आमदारकीचा रुबाब दाखवत महानिरीक्षक अनंत शिंदे यांच्या कार्यालयात धडकण्याचा प्रयत्नही केला परंतु त्याला तेथून पोलीस अधीक्षकांनी खेचून बाहेर काढले.
आमदार रमेश कदम राष्ट्रवादीतून निलंबित
By admin | Published: August 19, 2015 1:39 AM