शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

आमदार निवास सामूहिक बलात्कार प्रकरण : पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Published: April 22, 2017 1:53 PM

नागपूरमधील आमदार निवासातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीने शुक्रवारी रात्री आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि.22 -  नागपूरमधील आमदार निवासातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीने शुक्रवारी रात्री आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. राज्य महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे यांनी ही माहिती दिली. नैराश्यातून तिनं आपलं आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं. शिवाय आरोपींच्या ओळखीच्या लोकांनी पीडित मुलीच्या कुटुंबावर प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचीही माहिती समोर येत आहे.  
 
काय आहे प्रकरण?
सराफा दुकानात काम करणा-या एका तरुणीवर सराफा व्यापारी मनोज भगत (४४) तसेच तरुणीचा मित्र रजत मगरे (१९) या दोघांनी सतत चार दिवस सामूहिक बलात्कार केला. आमदार निवासाच्या खोली क्रमांक ३२० मध्ये ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणाचा बोभाटा झाल्याने प्रशासकीय यंत्रणेत प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
 
मनोज भगतच्या दुकानात काम करणाऱ्या 17 वर्षीय मुलीवर रजतची नजर होती. मनोज भगतनं पीडितेच्या घरी खोटं कारण सांगितले. मुलीला कुटुंबासह आग्रा येथे घेऊन जातो, असे खोटं सांगून तिला आमदार निवासात नेलं.  मनोज भगत याने रजतसाठी सर्व व्यवस्था केली होती. पण पीडित मुलीला एकटं पाहून मनोजनंही तिच्यावर अत्याचार केले. आणि दोघांनी मिळून पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार केला.
(नागपूरच्या आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार)
 
14 एप्रिल ते 17 एप्रिल चार दिवस आमदार निवासात मुलीवर बलात्कार होत होता. या काळात मुलीची तब्येत बिघडली. तिला फिगो कार (एमएच 31 ईके 5408) ने हॉस्पिटलमध्ये नेऊन पुन्हा आमदार निवासात आणलं. पण इथल्या व्यवस्थापनाला त्याची पुसटशी कल्पनाही नव्हती.  
(आमदार निवास प्रकरणाची सरकार, महिला आयोगाकडून दखल)
 
 या घटनेने पोलीस प्रशासन आणि सामाजिक वर्तुळच नव्हे तर राजकीय वर्तुळालाही जबर हादरा बसला आहे. सरकारच्या गृह विभाग, सार्वजिक बांधकाम मंत्रालयासोबतच राज्य महिला आयोगाकडून त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री प्रवीण पोटे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्वतंत्रपणे येथील शीर्षस्थ अधिकाऱ्यांकडे  संपर्क करून प्रकरणाची इत्थंभूत माहिती घेतली.  
 
पोलिसांनी घटना उघड होऊनही त्याची माहिती बाहेर जाऊ नये, यासाठी आटोकाट प्रयत्न केले. नियंत्रण कक्ष, माहिती कक्षात माहिती देण्याचे टाळले. मात्र, या प्रकरणाची माहिती उघड होताच भडका उडावा तसा प्रकार घडला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी सायंकाळी बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढून या प्रकरणाची माहिती घेत चौकशीचे आदेश दिले आहे. दुसरीकडे गृहमंत्रालयातूनही स्थानिक पोलिसांना विचारणा करण्यात आली आहे तर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी गिट्टीखदानचे अधिकारी तसेच पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याशी संपर्क करून या प्रकरणाची बारीकसारीक माहिती जाणून घेतली. दुसरीकडे महिला आयोगाच्या स्थानिक सदस्यांची चमू निता ठाकरे यांच्यासह गिट्टीखदान ठाण्यात पोहचली. त्यांनीही तेथील तपास अधिकारी यांच्याकडून माहिती घेतली.
 
कशी मिळते सहज खोली ?
विशेष म्हणजे, या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन आरोपी अटक झाल्यानंतर आणि पोलिसांची पथके आमदार निवासात बुधवारी सकाळपासून चौकशी करण्यासाठी चकरा मारत असतानाच आमदार निवासाच्या खोली क्रमांक २०७ मध्येही बुधवारी दुपारी  भावनांचा भडका  उडाला. आपल्या घरच्या व्यक्तीसोबत भलतीच महिला दिसल्याचे हे प्रकरण होते. (त्याची तक्रार करण्याचे टळल्याने या प्रकरणावर पडदा पडला.) या दोन्ही प्रकरणातून कर्मचारी आणि दलालांच्या अभद्र मैत्रीचे काळे कारनामे उजेडात आले आहे. संबंध नसताना येथे कुणालाही सहजपणे खोली कशी उपलब्ध करून दिली जाते, असा प्रश्न त्यातून उपस्थित झाला आहे. ज्या माननीय आमदारांच्या निवासासाठी ही वास्तू आहे तेथे कुणीही भामटे पोहचतात, येथे ओल्या पार्ट्या होतात, काही जण येथे नियमित जुगार खेळण्यासाठीही जातात, ही चर्चा जुनीच आहे. मात्र, महिला-मुली आणून त्यांचे शोषण करण्यासाठी अथवा आमदार निवासाच्या खोल्यांचा वापर केला जातो, हा प्रकारच प्रचंड संतापजनक ठरला असून, या गैरकामासाठी कोण जबाबदार आहे, त्याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.