शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

यवतमाळमध्ये पूर अन् भाजप आमदाराचा गौतमीसोबत डान्स; Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 5:14 PM

यवतमाळ जिल्ह्यात पूरस्थिती असताना आमदार संदीप धुर्वे यांनी केला गौतमी पाटीलसोबत डान्स केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.

BJP MLA Sandeep Dhurve Dance :  महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात पावसाने दडी मारलेली असताना मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हिंगोली, यवतमाळ, वाशिम, परभणी, नांदेडला मोठा फटका बसला. यवतामळमध्ये मुसळधार पावसाने सोयाबीन, कपाशीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. जिल्ह्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली असताना भाजपचे नेते आणि पदाधिकारी डान्सर गौतमी पाटीलच्या नाच गाण्यात दंग असल्याचे पाहायला मिळालं आहे. आर्णी- केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे यांचा गौतमी पाटीलसोबत ठेका धरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमदार संदीप धुर्वे यांच्या या व्हिडीओवरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.

यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. अशातच उमरखेडमध्ये भाजप आमदार नामदेव सासाने आणि भाजप समन्वयक नितीन भुतडा यांनी मंगळवारी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हा दहीहंडी महोत्सव आयोजित केला होता. या दहीहंडी महोत्सवात डान्सर गौतमी पाटीलने हजेरी लावली होती. मध्यप्रदेशचे मंत्री आणि यवतमाळ जिल्हा संघटनात्मक प्रभारी प्रल्हादसिंग पाटील हेसुद्धा यावेळी उपस्थित होते.

गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या कार्यक्रमात गौतमीसोबत आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी मंचावर ठेका धरला. आमदार संदीप धुर्वे यांच्या तुफान डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही हा व्हिडीओ ट्वीट करुन निशाणा साधला. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी नाचलो, अशी प्रतिक्रिया आमदार संदीप धुर्वे यांनी दिली आहे.

भाजप आमदार म्हणजे ‘एक ना धड भाराभर चिंध्या'; विजय वडेट्टीवारांची टीका

"भाजपचे आमदार म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. अशी भयानक स्थिती जिल्ह्यात असताना अडचणीत असलेल्या लोकांना वाऱ्यावर सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे गौतमी पाटील यांच्यासोबत बेभान नाचण्यात व्यस्त आहे. झोपी गेलेले मुख्यमंत्री, श्रेय लाटण्यात व्यस्त असलेले दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणे सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे काय करताय? जनाची नाही तर कमीत कमी मनाची लाज ठेवून तरी संकटसमयी लोकांच्या - शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जायला हवे होते. आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? महायुती सरकार जितकं असंवेदनशील तितकेच त्यातील आमदार उथळ आहे. भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना सत्तेच्या पैश्यातून आलेली ही मस्ती आणि हा बेभानपणा दोन महिन्यात जनता नक्की उतरवणार आहे," असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रYavatmalयवतमाळGautami Patilगौतमी पाटील