शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांची संजय राऊतांच्या विधानांवरून नाराजी!, नेमकं काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 5:23 AM

राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकाल आणि त्यानंतरच्या राजकीय वादविवादाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित आढावा बैठक झाली.

मुंबई :

राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकाल आणि त्यानंतरच्या राजकीय वादविवादाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित आढावा बैठक झाली. निकालानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या विधानांबद्दल या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. राज्यसभा निवडणुकीचे निकाल आणि आगामी विधान परिषद निवडणुकांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीस शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा  मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खा. सुनील तटकरे आदी नेते उपस्थित होते. 

राज्यसभेच्या निकालानंतर शिवसेना नेते राऊत यांनी केलेल्या विधानांवर या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे समजते. राऊत यांच्या विधानांमुळे आमदारांमध्ये विशेषकरून सहयोगी समर्थक आमदारांत नाराजी आहे. राऊत यांनी थेट राष्ट्रवादीच्या जवळ असणाऱ्या आमदारांची नावे घेतली. त्याचा आगामी विधान परिषद निवडणुकीत फटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात आली. अशा अनावश्यक विधानांमुळे सर्वच अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांंमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगितले गेले. 

- राज्यसभा निवडणुकीत खुल्या पद्धतीने मतदान असतानाही शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पराभवाचा फटका बसला. या महाविकास आघाडीचा पराभव आहे. संख्याबळ असतानाही असे निकाल लागले. विधान परिषदेसाठी मात्र गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे. त्यामुळे अपक्ष आणि सहयोगी आमदारांसोबत समन्वय, संवाद राखण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवार