शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा
4
Ratan Tata's Will : वारसदार ठरला! कोणाला मिळणार रतन टाटांची १० हजार कोटींची संपत्ती?
5
आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज'
6
मोगँबोच्या नातवाला पाहिलंत का? दिसायला इतका देखणा की स्टारकिडला देतोय टक्कर
7
किंग कोहली फुलटॉस बॉलवर फसला; Mitchell Santner नं उडवला त्रिफळा (VIDEO)
8
भाजपाला रामराम करत संजयकाका पाटील अजित पवार गटात; कवठेमहांकाळमधून उमेदवारी जाहीर
9
निवडणूक विशेष: तिकीट नाही? कर बंड, जा दुसऱ्या पक्षात! विधानसभेसाठी नाराजांचा नवा ट्रेंड
10
लेख: माझ्यावर हल्ला? -आता तुमची शंभरी भरली! आमचे सैनिक जळी-स्थळी दिसतील!
11
जागावाटपाचा संघर्ष मुख्यमंत्रिपदासाठी! निकालानंतर महत्त्वाच्या भूमिकेसाठी मित्रांशी संघर्ष
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
13
JioHotstar डोमेन खरेदी करून पठ्ठ्याने मागितले १ कोटी, आता Reliance नं काय केलं? काय आहे संपूर्ण प्रकरण?
14
“मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते”; मयुरेश वांजेळेंनी सांगितली भावूक आठवण
15
कधी अन् कुठं पाहता येईल IND-A vs AFG-A Semi-Final 2 ची लढत? जाणून घ्या सविस्तर
16
बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं
17
झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी; नवाब मलिकांना संधी नाही? अजित पवार म्हणाले...
18
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
20
Share Market Opening : आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स

सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा

By यदू जोशी | Published: October 25, 2024 8:40 AM

आज ईव्हीएमवर काही तासांतच निकाल लागतो. मात्र, पूर्वी मतपत्रिकांमुळे दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत निकाल लागायचे.

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कांटे की टक्कर, घासून झालेली निवडणूक, अत्यंत अटीतटीचा सामना असे शब्द समोर आले की आठवतात त्या राज्यातील अगदी कमी मतफरकाने फैसला झालेल्या विधानसभेच्या लढती. यातील बहुतेक निकालांना न्यायालयात आव्हान दिले गेले; पण त्या याचिका फेटाळल्या गेल्या. आज ईव्हीएमवर मतदान होते, पटापट कल कळतात आणि काही तासांतच निकाल लागतो. मात्र, पूर्वी मतपत्रिकांवर मतदान व्हायचे तेव्हा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत निकाल लागत. अवैध मतपत्रिकांबाबत उमेदवारांचे प्रतिनिधी आक्षेप घेत. त्याकाळी सहा मतांच्या फरकाने निकाल लागल्याची दोन उदाहरणे राज्यात आहेत.

१९७८ मध्ये जनता पक्षाची लाट असताना नांदेड जिल्ह्याच्या हदगाव मतदारसंघात या पक्षाचे निवृत्तीराव पवार यांनी काँग्रेसचे बापूराव शिंदे यांचा केवळ सहा मतांनी पराभव केला होता. १९९० मध्ये मध्य नागपूरने अशीच एक उत्कंठावर्धक लढत अनुभवली होती. जनता दलाचे डॉ. यशवंत बाजीराव यांनी काँग्रेसचे अनिस अहमद यांचा केवळ सहा मतांनी पराभव केला. प्रकरण उच्च न्यायालयात गेले. फेरमतमोजणी करण्यात आली तरीही डॉ. बाजीराव जिंकले आणि त्यांचे सहाचे मताधिक्य कायम राहिले. अनिस अहमद पुढे जिंकत गेले; पण आजही चर्चा होते ती त्यांच्या त्या सहा मतांनी झालेल्या पराभवाची.

१०० ते ३०० मतांच्या फरकाने जिंकलेले २३ आमदार असे

  वर्ष    आमदार    पक्ष    मतदारसंघ      मताधिक्य    

  • १९८०    बाबूराव चाकोते    काँग्रेस    सोलापूर शहर उत्तर    १०१
  • १९८५    अण्णा जोशी    भाजप    शिवाजीनगर, पुणे    १११        
  • १९९०     गोविंदराव चौधरी    भाजप    साक्री    ११३ 
  • १९८०    शिवशंकर उटगे    काँग्रेस    औसा    ११४         
  • १९९०    महादू बबोरा    काँग्रेस    शहापूर    ११८ 
  • १९७८    दगडू गलांडे    जनता पक्ष    हिंगोली    १२१         
  • १९९५    अब्दुल कादीर देशमुख    काँग्रेस    परतूर    १२२ 
  • १९९९    संजय देशमुख    अपक्ष    दिग्रस    १२६ 
  • १९८०    प्रेमकुमार शर्मा    भाजप    खेतवाडी    १४० 
  • २००४    डॉ. सतीश पाटील    राष्ट्रवादी    पारोळा    १४७ 
  • २००९    धनराज महाले    शिवसेना    दिंडोरी    १४९ 
  • १९८०    माधवराव पवार    काँग्रेस    गेवराई    १५७ 
  • १९८५    शहाजीराव पाटील    काँग्रेस    मोहोळ    १६७ 
  • १९८५    विठ्ठल तुपे    जनता पक्ष    पुणे कॅन्टोन्मेंट    १७७ 
  • १९७८    जनार्दन बोंद्रे    काँग्रेस    चिखली    १७८ 
  • १९९५    शहाजीबापू पाटील    काँग्रेस    सांगोला    १९२ 
  • १९९९    कल्याणराव पाटील    शिवसेना    येवला    २२१ 
  • १९८०    रामचंद्र बेंडाळ    काँग्रेस    गुहागर    २२६ 
  • १९८५    सदाशिवराव मंडलिक    समाजवादी काँग्रेस    कागल    २३१ 
  • १९७८    कन्हय्यालाल नहार    अपक्ष    नांदगाव    २४३ 
  • २००४    कमल उल्हास ढोले पाटील    राष्ट्रवादी    भवानीपेठ    २५७ 
  • २०१४    नारायण पाटील    शिवसेना    करमाळा    २५७ 
  • २०१४    अर्जुन खोतकर    शिवसेना    जालना    २९६

३०० ते एक हजारच्या फरकाने जिंकले ९३ आमदार

राज्याच्या इतिहासात ९३ आमदार हे ३०० ते एक हजार दरम्यानच्या मताधिक्याने जिंकले. त्यात दिलीप सोपल, कुमार सप्तर्षी, जयप्रकाश दांडेगावकर, रोहिदास पाटील, पद्मसिंह पाटील, सूर्यकांता पाटील, जिवा पांडू गावित, सुभाष देसाई, विक्रमसिंह पाटणकर, हशू आडवाणी, नंतर राष्ट्रपतिपद भूषविलेल्या प्रतिभाताई पाटील, मधुकर सरपोतदार या बड्या नेत्यांचा समावेश होता. अर्थात आधीच्या वा नंतरच्या निवडणुकीत यापैकी बरेच जण अधिकच्या फरकाने जिंकले होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४VotingमतदानElectionनिवडणूक 2024vidhan sabhaविधानसभा