संदीप प्रधान, मुंबई राज्यातील आमदारांचे गेले पाच वर्षे बंद झालेले विदेश दौरे पुन्हा सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. आमदारांनी विदेशात गेले पाहिजे. तेथील लोकशाही व्यवस्था व तंत्रज्ञान याचा अभ्यास केला पाहिजे. मीडियानेही या दौऱ्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, असे फडणवीस यांनी अलीकडेच विधिमंडळातील एका कार्यक्रमात स्पष्ट केल्याने आमदारांची टूरटूर पुन्हा सुरू होणार, असे संकेत प्राप्त झाले आहेत. मागील काँग्रेस प्रणीत सरकारमध्ये २०१० साली आमदारांचा शेवटचा विदेश दौरा युरोपात झाला. २०११ साली पुन्हा दौऱ्याची जुळवाजुळव सुरू झाली तेव्हा महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना आमदारांच्या विदेश दौऱ्यावर पैशाची उधळपट्टी कशाला, असा सवाल उपस्थित झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या दौऱ्याला विरोध करताना शिवसेनेचे आमदार दौºयात सहभागी होणार नाहीत, अशी भूमिका घेतली. त्यामुळे तत्कालीन विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी दौरा रद्द केला. त्यानंतर गेली पाच वर्षे आमदारांचे दौरे बंद झाले. राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत होणाºया विदेश दौºयात आमदारांना ब्रिटन, अमेरिका अथवा युरोपातील संसदीय कामकाज पद्धतीचा अभ्यास करण्याची संधी दिली जाते. याखेरीज तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वीजपुरवठा, रोजगाराच्या वेगवेगळ््या क्षेत्रातील संधी याची माहिती आमदारांना दिली जाते. या दौºयातील काही खर्च आमदार करतात व उर्वरित खर्च राज्य सरकार आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ करते. आमदारांनी केली होती मारहाण आमदारांच्या २००९ पूर्वी झालेल्या एका युरोप दौºयात निवास व भोजनाची व्यवस्था चांगली नसल्याने संतापलेल्या आमदारांनी टूर आॅपरेटरला बुकलून काढले होते. त्या वेळी हे प्रकरण बरेच गाजले होते. मध्यंतरीच्या काळात आमदारांचे दौरे थांबवण्याचे तेही एक कारण होते. आमदारांचा दौरा चीनला महाराष्ट्रातील आमदार राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या माध्यमातून आपला पहिला दौरा चीनला करतील, असे मुख्यमंत्री यांनी रविवारी स्पष्ट केले.
आमदारांचं वऱ्हाड पाच वर्षांनंतर जाणार विदेशी!
By admin | Published: June 15, 2015 5:23 AM