मुंबई : गेल्या महिन्यातच भाजपाकडून विधानपरिषदेचे आमदार झालेल्या गोपीचंद पडळकरांना (Gopichand Padalkar) लॉटरी लागली आहे. राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार यांच्यावरील टीकेमुळे पडळकरांचा फायदा झाल्याचे दिसत आहे. भाजपाने त्यांना आज थेट पश्चिम महाराष्ट्राच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजापचे प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली आहे. यामध्ये लोकसभेनंतर भाजपवासी झालेले कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनाही पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्तेपद देण्यात आले आहे. मुख्य प्रवक्ता म्हणून गेल्या महिन्यातच केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आज 10 प्रवक्ते व 33 पॅनल सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांना महाराष्ट्राला झालेला कोरोना म्हटले होते. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर पवारांनीच कोण पडळकर, डिपॉझिटही वाचवू न शकलेला, असे संबोधत या वादावर पडदा टाकला होता. पडळकरांनी अजित पवार यांच्या विरोधात बारामतीमध्ये भाजपातून विधानसभा निवडणूक लढविली होती. मात्र, पराभव स्वीकारावा लागला होता. अखेर माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना विधानपरिषदेवर घेतले आहे.
मुख्य प्रवक्ता - केशव उपाध्ये
प्रवक्ता –खा.भारती पवार - उत्तर महाराष्ट्र,आ.गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्र,आ. राम कदम – मुंबई,शिवराय कुलकर्णी – विदर्भ,एजाज देखमुख – मराठवाडा,भालचंद्र शिरसाट – मुंबई,धनंजय महाडीक – प. महाराष्ट्र,राम कुलकर्णी – मराठवाडा,श्वेता शालिनी – पुणे,अॅड. राहुल नार्वेकर – मुंबई.
पॅनेलिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आलेले सदस्य -गणेश हाके, अतुल शाह, आ.गिरीष व्यास, अवधूत वाघ, शिरीष बोराळकर, सुनील नेरळकर, सुधीर दिवे, डॉ.अनिल बोंडे, आ.अमित साटम, प्रवीण घुगे, रिदा रशीद, गणेश खणकर, मकरंद नार्वेकर, विनायक आंबेकर, शेखर चरेगांवकर, श्वेता परूळेकर, आ.सुरेश धस, प्रदीप पेशकार, आ.निरंजन डावखरे, लक्ष्मण सावजी, आरती पुगावकर, आरती साठे, राजीव पांडे, दिपाली मोकाशी, नितीन दिनकर, धर्मपाल मेश्राम, किशोर शितोळे, प्रेरणा होनराव, शिवानी दाणी, स्वानंद गांगल, आनंद राऊत, राम बुधवंत, प्रीति गांधी.
अन्य महत्वाच्या बातम्या...
SBI ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घ्या नाहीतर दंड भरा
महत्वाचे! गृहकर्जाच्या EMIवर बँका मोठी सूट देण्याच्या तयारीत; करत आहेत प्लॅनिंग
मुकेश अंबानी चार छोट्या कंपन्या खरेदी करणार; रिलायन्सकडून जोरदार प्रयत्न
Old Is Gold: खबरदार, जुने सोने विकायला जाल तर! जीएसटी भरावा लागण्याची शक्यता
BSNL चा जबरदस्त प्लॅन; केवळ 78 रुपयांत दररोज 3 जीबी डेटा, मोफत कॉलिंग
बघतोच अमेरिका F-16V कसे उडवितो! चीन खवळला; तैवानची एयरफील्डच उद्ध्वस्त करण्याची धमकी
सावधान! Work From Home चा मोठा फटका बसणार; Income Tax भरताना नाकीनऊ येणार